शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

आता ड्राईव्ह थ्रू करा कोरोनाची चाचणी सुरु २४ तासात मिळणार रिपोर्ट, आॅनलाईन नोंदणीची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 20:26 IST

ठाणे महापालिकेने आता कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव समोर ठेवून आणखी एक पाऊल उचलले आहे. ड्राईव्ह थ्रु चाचणीसाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून रुग्णांचे अहवाल २४ तासात प्राप्त होणार आहेत.

ठाणे : ठाणे शहरातील कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध प्रयत्न करण्यात येत असून आता ठाणेकर नागरिकांना सहजपणे कोरोनाची चाचणी करता यावी यासाठी राज्याचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उफक्र म) तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या पुढाकाराने महापालिका, इन्फेक्शन लॅब तसेच केआरएसएनएए डायग्नोस्टीक्स या आयसीएमआर प्राधिकृत लॅबच्या माध्यमातून ठाण्यात ड्राईव्ह थ्रू, च्या माध्यमातून नागरिकांसाठी टेस्टींग सुविधा सुरू करण्यात आली आहे.                        कॅडबरी जंक्शन आणि कळवा नाका येथे इन्फेक्शन लॅबच्या माध्यमातून ड्राईव्ह थ्रू पद्धतीने स्वॅब टेस्टींगची सुविधा निर्माण करण्यात येणार असून या सुविधेमुळे नागरिकांना स्वॅब तपासणीसाठी आता कुठल्याही लॅबमध्ये जाण्याची गरज नसून अॉनलाईन नोंदणी केल्यानंतर दिलेल्या वेळेत जाऊन कोरोनाची चाचणी करता येणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे चाचणी केल्यानंतर २४ तासांत त्या चाचणीचा अहवाल संबंधित व्यक्तींस अॉनलाईन पद्धतीनेच प्राप्त होणार आहे.या तपासणी केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रशिक्षीत कर्मचारी वर्ग नेमण्यात आला असून सकाळी १० ते ६ या वेळेत ही चाचणी करण्यात येते. दरम्यान तपासणीसाठी येताना आॅनलाईन नोदणीची आणि पैसे भरल्याची पावती घेवून स्वत:च्या बंदिस्त चारचाकी वाहनातूनच त्यांना बूथवर येणे अनिवार्य असणार आहे. सदर व्यक्तीचे त्याचे वाहनातच स्वॅब घेण्यात येतात. तपासणीनंतर त्याचा अहवाल त्या व्यक्तीस तसेच ठाणे महापालिकेस आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. या उपक्र मास ओबेराय रियॅलीटी यांनी सहकार्य केले असून इन्फेक्शन लॅबचे डॉ. सचिन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे.इन्फेक्शन लॅबच्या माध्यमातून कोरोना चाचणी करावयाची आहे त्यांना  http://infexn.in/COVID-19.html या लिंकवर तपासणीसाठी आॅनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल. सदर नोंदणीची आणि पैसे भरल्याची पावती तसेच महापालिकेच्या ताप बाह्यरूग्ण तपासणी केंद्र किंवा खासगी ताप बाह्यरूग्ण तपासणी केंद्रांकडून सदर रूग्णाची कोव्हीड चाचणी आवश्यक असल्याबाबतचे शिफारस पत्र, आयसीएमआरच्या मार्गदर्शक सुचनांनुसार फॉर्म ४४ मधील सर्व माहिती भरून संबंधित डॉक्टरचे पत्र तपासणी केंद्रांवर दाखिवल्यावर नागरिकांना त्यांच्या वाहनात बसूनच त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या चाचणीचा अहवाल २४ तासांत संबंधित व्यक्तींस आणि महापालिकेसही प्राप्त होणार आहे. दरम्यान एक ते दोन दिवसात केआरएसएनएए डायग्नस्टीक्सच्या माध्यमातूनही शहरात दोन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

  •  ड्राईव्ह थ्रू चाचणीसाठी रूग्णास स्वत:च्या बंदिस्त वाहनामधून येणे बंधनकारक आहे. किंवा महापालिकेच्या फिव्हर ओपीडीमधून संबंधित वैद्यकिय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून कोव्हीडसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अ‍ॅम्बुलन्सने तेथे जाता येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत दुचाकीस्वारास किंवा बंदिस्त वाहनांमधून न येणाऱ्या रूग्णांस चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. 
टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या