शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

खोटी माहिती देणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांना अखेर नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:32 AM

आॅनलाइनद्वारे ठाणे जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत.

ठाणे : आॅनलाइनद्वारे ठाणे जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. यावेळी सोयीची शाळा प्राप्त करण्यासाठी बहुतांश शिक्षकांनी खोटी व चुकीची माहिती भरून जवळच्या शाळांमधील बदलीचा लाभ घेतला आहे. जिल्हाभरातील सुमारे ६८ शिक्षकांनी खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे. या फसवणुकीमुळे जिल्हा परिषदेने आता त्यांना कायदेशीर नोटीस देऊन पाच दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे. यामुळे या शिक्षकांचे आता धाबे दणाणले आहे.जवळच्या शाळांमध्ये बदली करून घेण्याच्या हेतूने या ६८ शिक्षकांनी चुकीची व खोटी माहिती आॅनलाइन दाखल केल्याचे निदर्शनात आले आहे. बदलीद्वारे जवळच्या शाळेचा लाभ घेतलेल्या या शिक्षकांनी प्रशासनाची फसवणूक केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन प्राथमिक शिक्षण विभागास चांगलेच धारेवर धरले आहे. या शिक्षकांचे निलंबन व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने त्यांनी कायदेशीर बाबींची चाचपणी सुरू केली आहे. तत्पूर्वी या ६८ शिक्षकांना नोटीस देऊन त्यांना खोटी व चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केल्याने खुलासा मागितला आहे.।शिक्षकांची संख्या वाढून शिक्षण विभागाचे पितळ उघडप्राथमिक शाळांमधील या बहुतांश शिक्षकांना ही नोटीस प्राप्त झाल्याचे आढळून आले आहे. खोटी माहिती देऊन अवघड क्षेत्रातील शाळेऐवजी शहराजवळील आणि सोयीस्कर, सोपी शाळा मिळवणाºया शिक्षकांप्रमाणेच बनावट वैद्यकीय दाखले, पतीपत्नी एकत्रीकरण, आईवडील आजारी अशीही खोटी माहिती आॅनलाइन भरून जवळच्या सोयीस्कर शाळा मिळवणाºया शिक्षकांवर हा कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यामध्ये ६८ शिक्षकांची नोंद प्रशासनाने घेतली आहे. यापेक्षा अधिक शिक्षक या कारवाईस पात्र ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खोटी माहिती देऊन त्यांच्यावर ही कारवाई होत नसलेल्या शिक्षकांची तक्रार कारवाईस पात्र ठरवलेल्या शिक्षकांकडून केली जाणार आहे. यामुळे शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित व निष्काळजीपणाचे पितळ उघडे पडण्याची शक्यताही दिसून येत आहे.