कलानी टीमच्या नगरसेवकांना नोटिसा; कोकण विभागीय आयुक्तांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:40 AM2020-01-12T00:40:33+5:302020-01-12T00:40:52+5:30

महापौर निवडणुकीतील फाटाफुटीबाबत २४ ला सुनावणी

Notices to Kalani team councilors; Konkan Divisional Commissioner's Inquiry | कलानी टीमच्या नगरसेवकांना नोटिसा; कोकण विभागीय आयुक्तांची चौकशी

कलानी टीमच्या नगरसेवकांना नोटिसा; कोकण विभागीय आयुक्तांची चौकशी

Next

मीरा रोड : महापौर निवडणुकीत पक्षाचा व्हीप डावलणाऱ्या ओमी टीमच्या नऊ नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्तांनी नोटीस पाठवून २४ जानेवारीला सुनावणीसाठी बोलावले आहे. तक्रारदार व भाजपचे गटनेते जमनू पुरस्वानी यांनाही बोलावण्यात आले आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या पदावर गदा येण्याच्या भीतीने कलानी गटामध्ये खळबळ उडाली आहे.

उल्हासनगर महापौरपदाची निवडणूकगेल्या महिन्यात झाली. भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेनेच्या लीलाबाई अशान महापौरपदी निवडून आल्या. भाजपतील ओमी टीम समर्थक पंचम कलानी, रेखा ठाकूर, डिम्पल ठाकूर, दीपा पंजाबी, शुभांगी निकम, आशा बिºहाडे, जयश्री पाटील, आशा चक्रवर्ती व कविता गायकवाड या नऊ नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप डावलून भाजपचे जीवन इदनानी यांच्याऐवजी शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान केले. त्यामुळे महापौरपदी अशान, तर उपमहापौरपदी रिपाइंचे भगवान भालेराव निवडून आले. याप्रकाराने भाजपची नाचक्की झाल्याने, भाजपचे गटनेते जमनू पुरस्वानी यांनी कोकण आयुक्तांकडे धाव घेऊन या नगरसेवकांविरोधात याचिका दाखल केली होती.

पुुरस्वानी यांनी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी कोकण आयुक्तांकडे पाठपुरावा केला. अखेर, कोकण विभागीय आयुक्तांनी नगरसेवकांना नोटिसा पाठवून २४ जानेवारी रोजी म्हणणे मांडण्यासाठी बोलावले आहे. तसेच याचिकाकर्ते पुरस्वानी यांनाही बोलाविले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप डावलणाºया नगरसेवकांचे पद रद्द करून त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी याचिकेद्वारे पुरस्वानी यांनी केली. सर्व नगरसेविका कोकण आयुक्तांकडे बाजू मांडणार असल्याची माहिती कलानी यांनी दिली.

नगरसेवकांचे पद रद्द झाल्यास भाजप अल्पमतात
महापालिकेतील ७८ पैकी ४१ नगरसेवक भाजपचे असून महापौर निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला. व्हीप डावलून शिवसेना उमेदवारांना मतदान करणाºया नऊ नगरसेवकांचे पद रद्द झाले, तर भाजप महापालिकेत अल्पमतात येणार आहे. तसेच पोटनिवडणुकीत हे नगरसेवक पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी आहे.

Web Title: Notices to Kalani team councilors; Konkan Divisional Commissioner's Inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.