शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार सोसायट्यांना बजावल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:14 IST

केडीएमसीने केले कचरा वर्गीकरण सक्तीचे; २१९ संस्था कचऱ्यापासून करतात खतनिर्मिती

- मुरलीधर भवार कल्याण : ओला-सुका कचरा वर्गीकरणासाठी केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील पाच हजार सोसायट्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यापैकी २१९ सोसायट्यांनी कचरा वर्गीकरणासाठी पुढाकार घेत ओल्या कचºयापासून खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे. तर, सुका कचरा या सोसायट्या घंटागाडीत जमा करत आहेत. अन्य सोसायट्यांनीही पुढाकार न घेतल्यास महापालिका त्यांचा कचरा घेणे बंद करणार आहे.महापालिका हद्दीतील २० हजार चौरस मीटर आकारमानाच्या ३० सोसायट्यांनी त्यांच्या कचºयाची विल्हेवाट सोसायटीच्या आवारात लावणे बंधनकारक आहे. या सोसायट्यांचा कचरा उचलला जाणार नाही, असा इशारा महापालिकेने दोन वर्षांपूर्वी दिला होता. तसेच जास्त सदनिका असलेल्या सोसायट्यांनीही त्यांच्या कचºयाचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. महापालिकेने त्यासाठी यापूर्वीच ३५ हजार नोटिसा विविध सोसायट्यांना पाठविल्या होत्या. त्यामुळे महापालिका व सोसायट्या यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. महापालिकेने प्रक्रिया प्रकल्प उभारलेले नसताना कशाच्या आधारे कचरा वर्गीकरणाची सक्ती केली आहे, असा सवाल त्यावेळी उपस्थित झाला होता. त्यामुळे महापालिका तेव्हा बॅकफूटवर गेली होती.आता उंबर्डे व बारावे येथे १० टन क्षमतेच्या कचºयापासून बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्प आहे. तसेच प्लास्टिक कचºयापासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प बारावे येथे कार्यान्वित आहे. डोंबिवलीतही आयरे येथे बायोगॅस प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पांना पुरेसा ओला कचरा जात नाही. त्यामुळे हॉटेलमधील उष्टे-खरकटे अन्न, बाजारातील भाजीपाल्याचा कचरा प्रकल्पास जात आहे. सोसायट्या त्यांच्या आवारात ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करीत आहेत. आयरे येथील बायोगॅस प्रकल्पास सात टन ओला कचरा जातो. तर, उंबर्डे प्रकल्पास पाच टन ओला कचरा प्रक्रियेसाठी जातो. सोसायट्यांमध्ये ओल्या कचºयापासून खतनिर्मिती केली जात असल्याने जवळपास साडेपाच टन ओला कचरा आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर जात नाही, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश बोराडे यांनी दिली.घनकचरा विभागाने डोंबिवलीतील दत्तनगर जलकुंभानजीक तसेच कल्याणमध्ये लोकधारा येथे सुका कचरा वर्गीकरणाची शेड उभारली आहे. अन्य आठ प्रभागांत अशाच प्रकारची कचरा वर्गीकरणाची शेड उभारली जाणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी नागरिकांचा कचरा वर्गीकरणाच्या शेड उभारणीस विरोध असल्याने काम मागे पडले आहे.कचरा वर्गीकरण करणाºया सोसायट्यारिजन्सी, रौनक, गुरू आत्मन, आनंदसागर, मंगेशी हाइट्स, मेट्रो मॉल, मेट्रो रेसिडेन्सी, लोकवाटिका, लोकग्राम, मोहन सृष्टी, द्वारकानगरी, श्रीहरी कॉम्प्लेक्स, वृंदावन सोसायटी, शुभम हॉल, अंबिका पॅलेस, विश्वनाथ सोसायटी, बालाजी गार्डन, लोढा हेवन, स्वामी विवेकानंद शाळा, औद्योगिक वसाहतीमधील दोन सोसायट्या आदी २१९ सोसायट्यांचा समावेश आहे.