शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नाल्यांवरील बांधकामांना ठामपाच्या पुन्हा नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 00:28 IST

नालेसफाई, रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारांची सफाई कोणत्याही परिस्थितीत २ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.

ठाणे : शहरातील नालेसफाई, रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारांची सफाई कोणत्याही परिस्थितीत २ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. त्याचबरोबर मुख्य रस्ते, सेवारस्ते, उड्डाणपूल याठिकाणी उभी केलेली बेवारस वाहने इतरत्र हलवणे, जीवितहानी टाळण्यासाठी नाल्यांवरील बांधकामांना नोटिसा देण्याबरोबर पावसाळ्याआधी रस्त्यांवरील चरांचे पुनर्पृष्ठीकरण करून कुठलीही दुर्घटना अथवा जीवितहानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.आयुक्तांनी महापालिकेचे सर्व अधिकारी, मेट्रो, महावितरण, महानगर गॅस, एमएमआरडीए आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक नागरी संशोधन केंद्रात घेऊन मान्सूनपूर्व करावयाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केल्या. तसेच या रस्त्यांवर टेम्पो-रिक्षांचे पार्किंग तत्काळ बंद करून भविष्यात ते होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही वाहतूक पोलिसांना सूचित केले.कोणत्याही परिस्थितीत विविध कामांसाठी खोदण्यात आलेले रस्ते पूर्वरत करणे, खड्डे बुजवणे, विटावा येथे उच्चक्षमतेचे पंप लावणे, ज्या खोलगट भागात पाणी साचते, त्या भागात आवश्यक ती खबरदारी घेणे तसेच त्याठिकाणी माहितीफलक लावणे आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.गरज असेल तिथे सीसीटीव्ही कॅमेरेज्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी बॅरिकेडिंगमुळे पाणी अडणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यावी, तसेच त्या ठिकाणचे डेब्रिज तत्काळ उचलावे, असे सांगत शक्य असेल, तर या ठिकाणी पावसाळ्याच्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे लावता येतील का, याची पडताळणी करण्याच्या सूचना त्यांनी मेट्रोच्या अधिकाºयांना दिल्या.>औषधसाठ्याची तजवीत करापावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते बुजवण्यासाठी आधीच एजन्सी निश्चित करावी. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे स्वाइन फ्लू कक्ष सुरू करणे, आवश्यक तो औषधसाठा करणे, इमारत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक ती फवारणी करण्याबाबत विकासकांना पत्र देणे, वृक्षछाटणी करणे, छाटलेल्या फांद्या वेळेत उचलणे आदी कामांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.धोकादायक इमारती खाली करापावसाळ्यात नाल्यावरील बांधकामे वाहून जाऊन जीवितहानी होऊ नये, यासाठी नाल्यांवरील बांधकामांना नोटिसा देण्याची कार्यवाही करण्याबरोबरच कोणत्याही स्थितीत सी-१ आणि सीटू-ए या इमारती खाली करण्याचे आदेश त्यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका