शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

घर विकताना NOC हवीच, गृहनिर्माण खात्याला अधिकार नाही - सीताराम राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 05:58 IST

घर विकण्यासाठी सोसायटीच्या अध्यक्ष, सचिवांच्या एनओसीची गरज नाही, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी स्पष्ट केले.

सुरेश लोखंडेठाणे :

घर विकण्यासाठी सोसायटीच्या अध्यक्ष, सचिवांच्या एनओसीची गरज नाही, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी स्पष्ट केले. सहकार क्षेत्राच्या कायद्यात व उपविधीमध्ये २०१४ मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आव्हाड, यांनी नवीन काहीच सांगितलेले नाही. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने, सोसायटीची थकबाकी वसूल करण्याकरिता व शेअर सर्टिफिकेटवर नव्या मालकाचे नाव नोंदविण्याकरिता सोसायटीच्या अध्यक्ष, सचिवांची पूर्वपरवानगी घेणे हितकारक आहे. शिवाय गृहनिर्माण खात्याला सहकार क्षेत्रातील तरतुदीचा अधिकारही नाही, असे मत ठाणे जिल्हा हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

गृहनिर्माण सोसायटीमधील रहिवाशांना घर विकण्यासाठी आता सोसायटीचे अध्यक्ष, सचिवांच्या परवानगीची गरज नसल्याचे आव्हाड यांनी बुधवारी जाहीर केले. याबाबत राणे म्हणाले की, सहकार कायद्यात व उपविधीमध्ये ही तरतूद २०१४ पासून आहे. सहकार खात्याच्या आधीच्याच कायद्याविषयी बोलून आव्हाड यांनी गृहनिर्माण विभागाचा निर्णय असल्याचे भासवले. 

सोसायटीमधील घर विक्रीला काढले असता अध्यक्ष, सचिव आणि अन्य पदाधिकारी ते घर आपल्या नातेवाइकास, जवळच्या मित्रास घेता यावे म्हणून घर मालकाला एनओसी देण्यास टाळाटाळ करतात. त्यातून घर मालकाची सुटका करण्यासाठी सहकार कायदा व त्यातील उपविधीमध्ये परवानगी घेण्याची गरज नसल्याची तरतूद केली. घर विकताना व भाड्याने देताना परवानगी घेण्याची तरतूद सुरक्षेच्या दृष्टीने सोसायटी व रहिवाशांच्या हिताची आहे. घर भाड्याने देण्याची पूर्वसूचना पोलिसांना द्यावी लागते. घर विकल्यानंतर शेअर सर्टिफिकेटवर नवीन घरमालकाचे नाव नोंदविण्याचा विषय सोसायटीच्या मिटिंगमध्ये चर्चेला येतो. सोसायटीची थकबाकी भरल्याशिवाय घर विक्रीचा व्यवहार होत नाही. सोसायटीच्या पूर्वपरवानगीमुळे थकबाकी राहात नाही, याकडे राणे यांनी लक्ष वेधले.

जिल्ह्यात ३२ हजार हाउसिंग साेसायट्या! जिल्ह्यात ३२ हजार गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यापैकी ठाणे शहरात सहा हजार ५०० सोसायट्यांमध्ये एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोक राहतात. अनेक सोसायट्यांमध्ये काही रहिवासी व सोसायटीचे पदाधिकारी यांच्यात मेंटेनन्सच्या थकबाकीपासून अनेक विषयांवरून वाद असतात. त्यामुळे पदाधिकारी फ्लॅट विकण्याकरिता अथवा भाड्याने देण्याकरिता ना-हरकत प्रमाणपत्र देत नाहीत ही याची एक बाजू आहे; पण त्याचवेळी चुकीच्या व्यक्तीला फ्लॅट विकला किंवा भाडेकरू म्हणून ठेवल्यानंतर काही गुन्हेगारी स्वरूपाची घटना घडल्यावर फ्लॅट मालकाने सोसायटीला विश्वासात घेतले नसल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmhadaम्हाडा