शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

ज्येष्ठ नागरिकांना ना पाणी, ना खुर्च्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 00:28 IST

लसीकरण केंद्रांवर तिसऱ्या दिवशीही गोंधळ कायम : वयोवृद्धांच्या नशिबी गैरसोय कायम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : लसीकरणाच्या तिसऱ्या  दिवशीही पालिकेच्या अनेक केंद्रांवर गोंधळ दिसून आला. पोस्ट कोविड सेंटर, बाळकुम येथील कोविड सेंटर, मनोरमानगर, दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळील केंद्रासह इतर केंद्रांवर ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्च्या नसणे, वारंवार सर्व्हर डाउन होणे, पिण्यास पाणी उपलब्ध नसणे, असा सावळागोंधळ होता. त्यामुळे सलग तिसऱ्या  दिवशी लसीकरणाकरिता आलेल्या ज्येष्ठांना त्रासाला सामोरे जावे लागले.ठाणे  महापालिका हद्दीत खाजगी रुग्णालयांच्या ठिकाणी अद्यापही लसीकरण सुरू झालेले नाही. मात्र, महापालिकेने शहरातील १५ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी या केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. मात्र, मंगळवारी दुसऱ्या दिवशी या केंद्रांवर सुमारे एक हजारांच्या आसपास ज्येष्ठांचे लसीकरण झाले. तिसऱ्या दिवशीदेखील अनेक केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसह दुसरा डोस घेणाऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे गोंधळ उडाला होता. पोस्ट कोविड सेंटर येथे वेळेआधीच ज्येष्ठांनी रांग लावली होती. त्यांना बसण्यासाठी खुर्च्या नव्हत्या. त्यामुळे ते ताटकळल्याचे दिसून आले. अर्ध्या तासानंतर ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या. सर्व्हर वरचेवर डाउन झाल्याचे दिसून आले. अशीच परिस्थिती दादोजी कोंडदेव येथील केंद्रावर होती. तेथेही ज्येष्ठांना नाना समस्यांना सामोरे जावे लागले. बसण्यासाठी खुर्च्या नसणे, उन्हाच्या झळांचा त्रास सुरू झालेला असताना पिण्यास स्वच्छ पाणी नसणे, या समस्यांमुळे ज्येष्ठांनी तीव्र नाराजी प्रकट केली. या संदर्भात जगदीश खैरालिया यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधून तक्रार केल्यावर खुर्च्या आणि पाण्याची व्यवस्था केली गेली. मनोरमानगर केंद्रावर सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत सर्व्हर डाउन असल्याने सकाळपासून आलेल्या ज्येष्ठांना मनस्ताप सहन करावा लागला. ॲप वारंवार डाउन होत असल्याने आपला नंबर केव्हा लागणार, अशी विचारणा ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात होती.

नव्या वर्षात सापडले सर्वाधिक ८१८ रुग्णलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नव्या वर्षातील सर्वाधिक ८१८ रुग्ण  आढळले.  यामुळे जिल्ह्यात आता २ लाख ६७ हजार ९१० रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात सहा जण दगावल्याने मृतांची संख्या ६ हजार २८६ झाली आहे.   ठाणे शहर परिसरात २३५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६२ हजार ८८८ झाली. शहरात एकाच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूंची संख्या १ हजार ३९० वर गेली. कल्याण-डोंबिवलीत २४२ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत १५३ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यूसंख्या दोन आहे. उल्हासनगरमध्ये २४ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू झाला नाही. भिवंडीत दोन बाधित असून एकही मृत्यूची नोंद नाही.  मीरा-भाईंदरमध्ये ६९ रुग्ण आढळले. अंबरनाथमध्ये २२ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. बदलापूरमध्ये ३९ रुग्णांची नोंद झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ३२ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले आहेत.