शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

ना टेस्टिंग, ना लसीकरण, तिसरी लाट कशी रोखणार! ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेचा कहर : लसीकरणाबाबत गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 08:50 IST

जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात आतापर्यंत २९ हजार ३६४ रुग्ण सापडलेले आहेत.

सुरेश लाेखंडे - ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातही प्रतिबंधात्मक लसीकरण हाती घेतले असले तरी गैरसमज आणि अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ग्रामीण आदिवासी, ग्रामस्थांनी या लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. त्यात आता तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यास रोखण्यासाठी ग्रामीण भागात विविध उपाययोजनांचे अद्यापही नियोजन दिसत नाही. ना टेस्टिंग, ना लसीकरण मग तिसरी लाट ग्रामीण भागात कशी रोखणार अशा शंका, कुशंका जाणकारांकडून व्यक्त केल्या जात आहे.जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात आतापर्यंत २९ हजार ३६४ रुग्ण सापडलेले आहेत. या रुग्णांमधील २५ हजार ७०९ जणांत उपचारानंतर सुधारणा झाली आहे. कोरोनामुक्त होण्याचे हे प्रमाण ८७.५५ टक्के आहे. बचावासाठी तब्बल ५७ हजार २७४ जणांनी स्वॅब तपासणी केलेली आहे. यात सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी आतापर्यंत ७३० जणांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यातील या मृत्यूंचे प्रमाण २.४९ असे आहे. जिल्ह्यातील गावागावांमधील घरात आजपर्यंत क्वारंटाइन झालेल्यांमध्ये ४२ हजार २८३ ग्रामस्थांचा समावेश आहे. यामुळे घरात १४ दिवस विलगीकरणात राहून बरे झालेल्या ३६ हजार १५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.जिल्ह्यात सध्या स्थितीला दोन हजार ९२५ रुग्ण ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. यापैकी एक हजार ८६९ जण घरात राहूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात ७५ जण उपचार घेत आहेत. तर वेगवेगळ्या रुग्णालयात ९८१ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. याशिवाय या ग्रामीण भागातील रहिवासी असलेले पण शहरात ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या तब्बल ९५ रुग्णांचा समावेश आहे. तर गंभीर आजारी असल्यामुळे सहा जणांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. यामुळे ग्रामीण भागातील रहिवासी कोरोनाच्या आजाराने मेटाकुटीला आले आहे. त्यात गैरसमज असल्यामुळे बहुतांशी ग्रामस्थ उपचारापासून लांब जात आहे. त्यांच्यातील हा गैरसमज दूर करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे. त्यांच्या बोली भाषेत गावोगाव प्रचार सध्या रंगलेला आहे. मात्र, आगामी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने काय नियोजन केले, याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस