शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार कोणीही असला तरी प्रत्येक जागेची जबाबदारी भाजपाची असेल- चंद्रशेखर बावनकुळे

By अजित मांडके | Updated: October 17, 2023 13:06 IST

लोकसभा प्रवास अंतर्गत मंगळवारी बावनकुळे हे ठाण्यात आले होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

ठाणे : कोण, कुठे उभा राहणार, कोणती जागा कोणाला मिळणार याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी कमिटी, राज्यातील महायुतीचे तीन नेते आणि इतर घटक पक्षातील महत्त्वाचे नेते हा निर्णय घेतील. आमच्यात कुठेही मतभेद नाहीत किंवा मनभेदही नाहीत, उमेदवार कोणी जरी असला तरी प्रत्येक जागेची जबाबदारी ही भाजपचीच असेल असे मत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. 

लोकसभा प्रवास अंतर्गत मंगळवारी बावनकुळे हे ठाण्यात आले होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात महाविजय २०२४ ची तयारी सुरू आहे त्यानुसार राज्यातून ४५ खासदार ५१ टक्के मते घेऊन मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.५१ टक्के मते ही भाजपची असतील मग महायुतीचा उमेदवार कोणी असेल त्याला भाजप निवडून आणेल असेही ठामपणे त्यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे 225 आमदार असतील असा दावाही त्यांनी केला.ठाणे असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल अथवा राज्यातील इतर ठिकाणी कुठेही कोणामध्ये मतभेद नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीबाबत त्यांना चिडले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. ठाण्यात ६०० वॉरियर्स हे साडेतीन लाख घरापर्यंत जाऊन जनतेला सरकारने केलेला कामांची माहिती देतील तसेच जनतेच्या मनात असलेले गैरसमज ही दूर करतील असेही त्यांनी सांगितले.  

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्व पक्षांची इच्छा आहे. यापूर्वीच मराठ्यांना आरक्षण मिळाले असते मात्र उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुकांमुळे ते आरक्षण मिळू शकले नाही. मात्र आता आमची भावना हीच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे. परंतु हे आरक्षण देत असताना इतर समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू दिला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा