शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
3
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
4
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
5
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
6
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
7
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
8
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
9
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
10
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
11
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
12
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
13
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
14
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
15
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
16
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
17
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
18
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
19
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
20
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका

सेलिब्रेटींसाठी क्रीडागृहात खेळाडूंना नो एण्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:10 IST

पालकमंत्र्यांसोबत तू तू मैं मैं; सोमवारी काढणार तोडगा; संतप्त पालकांचा सामन्यांदरम्यान गोंधळ

ठाणे : आधीच दादोजी कोंडदेव क्रीडागृहात केलेल्या बदलाविरोधात येथे सराव करण्यासाठी येणारे अ‍ॅथलेटिक्सपटू नाराज असताना शुक्रवारी सेलिब्रिटी क्रिकेट सामन्यांसाठी त्यांना मैदानात सरावास पालिकेने बंदी घातली. यामुळे संतप्त झालेल्या धावपटूंच्या पालकांनी सकाळी सेलिबे्रटी सामन्यांदरम्यान गोंधळ घालून क्रि केट सामन्यांसोबतच अ‍ॅथलेटिक्सना मैदानात खेळू देण्याची मागणी केली. यावरून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकांमध्ये तू तू मैं मैं सुद्धा झाली. अखेर, पालकमंत्री आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पालकांसोबत चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी बैठक आयोजित करण्याचे जाहीर केले.महापालिकेच्या दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात नवीन खेळपट्टी तयार केली असून त्यानिमित्ताने शुक्रवारपासून येथे मराठी कलाकारांचे क्रिकेट सामने आयोजिले आहेत. त्यामुळे येथे सरावासाठी येणाऱ्या धावपटूंना सरावासाठी बंदी केली आहे. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी सरावासाठी गेलेल्या धावपटूंना प्रवेश नाकारून घरी पाठवले.शुक्र वारी सकाळी सेलिबे्रटी सामन्यांच्या उद्घाटनासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आले होते. यावेळी धावपटूंना सरावास का बंदी घातली, याचा जाब विचारण्यासाठी ३० ते ४० पालक मैदानात आले. मैदानात यापूर्वी क्रि केटपटू आणि धावपटू असे दोघेही सराव करायचे. परंतु, आता अचानक धावपटूंना सरावास बंदी घालण्यामागचे कारण काय, असा सवाल पालकांनी केला. यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाल्याने त्यांची पालकांसोबत तू तू मैं मैं झाली. अखेर, नमते घेऊन शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पालकांसोबत चर्चा करून यासंदर्भात सोमवारी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहातील सिंथेटिक ट्रकचा काही भाग दुरुस्तीसाठी काढला आहे. त्यामुळे धावपटूंना मैदानाऐवजी पायºयांवर सराव करावा लागत आहे. यामुळे मुलांच्या गुडघ्याला आणि पायाला जखमा होत आहे. अशा परिस्थितीतही धावपटू राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकावत आहेत. त्यात आता मैदानात सरावासाठी बंदी घातल्याने पालकांनी नाराजी तीव्र व्यक्त केली.ठाण्यात सिनेकलाकारांचे क्रिकेट सामनेशुक्रवारच्या दिवशी पहिला सामना मुंबईचे मावळे व बाणेदार ठाणे यांच्यात झाला. यामध्ये बाणेदार ठाणे संघ विजयी झाला. दुसरा सामना खतरनाक मुळशी विरु द्ध मीडिया लढवय्या यांच्यात पार पडला. यामध्ये खतरनाक मुळशी संघ विजयी झाला. तर, अंतिम सामना मुंबईचे मावळे व मीडिया लढवय्या यांच्यात झाला.यामध्ये मीडिया लढवय्या संघ विजयी झाला. या तीन सामन्यांत मीडिया लढवय्याचा अनिकेत पाटील, बाणेदार ठाणेचा संदीप जुवाटकर, तर खतरनाक मुळशीचा उदय पाटील यांना मॅन आॅफ द मॅच म्हणून पुरस्कार देण्यात आले. या स्पर्धेत विजय केंकरे, राजेश शृंगारपुरे, संजय नार्वेकर, प्रथमेश परब, प्रवीण तरडे, विजय आंदळकर, अमित भंडारी आदी सिनेनाट्य कलाकार सहभागी होते.

पालकांनी सिंथेटिक ट्रॅकसंदर्भात चर्चा केली. त्यावर, तोडगा काढण्याचेही त्यांना सांगण्यात आले आहे. परंतु, यावेळी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा अरेरावी झालेली नाही. यावर आयुक्तांसमवेत तोडगा काढला जाणार आहे.- एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा

टॅग्स :thaneठाणेCelebrityसेलिब्रिटीEknath Shindeएकनाथ शिंदे