शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील डॉ. मूस रोडवरील राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांचा रेड सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 23:22 IST

अन्यत्र सभा घेतल्यास सकारात्मक विचार 

जितेंद्र कालेकरठाणे: शनिवारी एकाच दिवशी एकाच मार्गावर अनेक कार्यक्रम असल्यामुळे तसेच राम नवमी, रमजान व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर सभा घेणे हे कायदा सुव्यवस्था बिघडवू शकते. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात येत असल्याचा शेरा ठाणे पोलिसांनी मनसेच्या अर्जावर दिला आहे. अर्थात, अन्यत्र सभा घेतल्यास सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही पोलिसांनी म्हटल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्षा राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे, मदरशांमधील गैरप्रकार आणि हनुमान चालिसा आदी विविध मुद्यांवर आपली आक्रमक भूमिका मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर ठाण्यात ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मनसेच्या या जाहीर सभेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहासमोरील डॉ. मूस रोडवर सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नौपाडा पोलीस ठाण्यात परवानगीचा अर्ज दिला होता. मात्र ठाणे पोलिसांनी या सभेस परवानगी नाकारण्यात येत असल्याचा शेरा बुधवारी दिला आहे. राम नवमी, रमजान व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर सभा घेणे हे कायदा सुव्यवस्था बिघडवू शकते. त्यामुळे ही परवानगी नाकारण्यात येत असल्याचे कारण ठाणे पोलिसांनी दिले आहे सभेला गर्दी होण्याची शक्यता असून ज्या ठिकाणी सभा आयोजित करण्याचा विचार आहे ते ठिकाण रहदारीचा मार्ग आहे. त्यामुळे ही परवानगी नाकारली आहे. अन्यत्र सभा घेतल्यास सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही मनसेला सुचविले आहे. अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेthaneठाणे