शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

२डी ईको नाही, एमआरआयची सुविधा नाही, रुग्णांचे बेहाल 

By जितेंद्र कालेकर | Updated: August 16, 2023 11:18 IST

ठाणे जिल्हा रुग्णालयात दररोज ७५० ते १,१५० रुग्ण येतात ओपीडीत

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीणसह सामान्य नागरिकांसाठी आधार असलेल्या विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज ७५० ते १,१५० रुग्ण बाह्यरुग्ण (ओपीडी) तपासणीसाठी येतात. मंगळवारी ही संख्या जेमतेम ४५ इतकीच होती. रुग्णालयात गेल्या २४ तासांमध्ये चार  महिलांच्या तातडीच्या प्रसूती शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. मात्र, हृदयाच्या तपासणीसाठी होणारी २डी ईको (2D Echo Test) आणि डोक्याला मार लागल्यानंतर होणारे एमआरआय या तपासण्या होत नसल्याने रुग्णांना इतरत्र जावे लागल्याची तक्रार रुग्णांनी केली.कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्ण दगावल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. ‘लोकमत’ने मंगळवारी आढावा घेतला. वेगवेगळ्या विभागांमध्ये तपासणीला मंगळवारी दोन लहान मुले, २२ महिला आणि २१ पुरुषांसह ४५ रुग्ण आले हाेते. दरम्यान, अपघातासह तातडीची वैद्यकीय सेवा २४ तास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

एका दिवसात ६१ रुग्ण दाखल

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून सोमवारी चार, तर मंगळवारी एक रुग्ण दाखल झाला. सध्या या रुग्णालयात जनरल वाॅर्डमध्ये ३३६ बेड असून, त्यात १६८  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये १४ ऑगस्टपासून २८ रुग्ण थेट दाखल झाले, तर कळव्याच्या रुग्णालयातून सहा आणि इतर रुग्णालयांतून २७ असे ६१ रुग्ण दाखल झाले. अतिदक्षता विभागात २४ बेड असून, ते सर्व भरले आहेत. यामध्ये २४ तासांमध्ये ११ रुग्ण दाखल झाले. चार महिलांची तातडीची प्रसूतीही यशस्वीपणे पार पडल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली.

भिवंडीचे रुग्णालय सक्षम करावे 

महिलांच्या आजारांसंबंधी काही महिलांना भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयातून ठाण्याच्या सिव्हिलमध्ये पाठविले होते. इकडे चांगले उपचार मिळाले, पण  तिकडे चांगल्या सुविधा मिळाल्या, तर ठाण्यापर्यंतची कसरत करावी लागणार नाही, अशी प्रतिक्रिया जरीन खान या भिवंडीच्या महिलेने व्यक्त केली. 

समन्वयासाठी डाॅक्टरांचे पथक 

कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात समन्वय राहण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.धीरज महांगडे, डाॅ.ममता अनासपूरकर आणि डाॅ.श्रीजित शिंदे यांचे पथक नेमण्यात आले आहे, तसेच दाेन रुग्णवाहिकाही माेफत उपलब्ध राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यांची प्रतीक्षा 

शरीर तपासणीसाठी एमआरआय, डोक्याला मार किंवा अंतर्गत रक्तस्राव असल्यास सिटी स्कॅन, त्याचबरोबर हृदय तपासणीचे २डी ईकोही या ठिकाणी नाही. त्यासाठी इतर रुग्णालयात जावे, अशी तक्रार केली.

 

टॅग्स :kalwaकळवाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल