शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नितीन जंक्शनचा पूल धोकादायक, श्वेतपत्रिका न काढल्यास हायवे जॅम करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 04:57 IST

कोपरीच्या धोकादायक पुलाबाबतीत ठामपा, एमएसआरडीसी आणि बांधकाम खात्याने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसतानाच आता ठाणे शहरातील सर्वात मोठा समजला जाणारा नितीन जंक्शनचा उड्डाणपूलही धोकादायक झाल्याचा अहवाल आयआयटीने दिला आहे.

ठाणे - कोपरीच्या धोकादायक पुलाबाबतीत ठामपा, एमएसआरडीसी आणि बांधकाम खात्याने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसतानाच आता ठाणे शहरातील सर्वात मोठा समजला जाणारा नितीन जंक्शनचा उड्डाणपूलही धोकादायक झाल्याचा अहवाल आयआयटीने दिला आहे. मात्र, रस्ते विकास महामंडळाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. ‘नागरिक मरायचे तर मरू दे. आमची सत्ता येऊ दे’ असाच नारा या सरकारचा आहे; अशी टीका करून पुलांची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. आठ दिवसांत ती जारी केली नाही, तर आम्ही हायवे बंद करू, असा इशाराही त्यांनी दिला.ठाणे-मुंबई जोडणारा कोपरी पूल धोकादायक झाल्याने त्यावर गतिरोधक आणि उंचीरोधक बसवून धोक्याचा इशारा देणारा फलक लावण्याच्या सूचना रेल्वेने केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अशातच नितीन जंक्शन-कॅडबरी पूल धोकादायक झाल्याचा अहवाल आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ सविक बॅनर्जी आणि आर. एस. जहाँगीर यांनी एमएसआरडीसीला सादर केला आहे. तो अहवालच त्यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत सादर केला.आयआयटीने नितीन जंक्शन पुलाचे २०१७ मध्ये परीक्षण करून २२ नोव्हेंबर २०१७ ला अहवाल सादर केला. त्यात पुलाच्या सर्व गर्डरना बाक येऊन तडेही गेले आहेत. त्याच्या स्लॅबसाठी वापरलेले काँक्रिटही सुमार दर्जाचे असल्याचे नमूद केलेले आहे. मुंबईतील पुलाची दुर्घटना अशाच त्रुटींमुळे घडली आहे. त्यामुळे हा पूलही कोसळण्याची दाट शक्यता आहे. तो कोसळल्यास अनेकांचे जीव तर जातीलच, शिवाय नाशिकमार्गे होणारी उत्तरेकडील वाहतूकही ठप्प होईल. शरद पवार यांनीही या पुलांच्या बाबतीत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही, अशी जोरदार टीका आव्हाड यांनी यावेळी केली.तर ‘तेच’ जबाबदारएमएसआरडीसीने नितीन जंक्शन पुलाचे आॅडिट केले आहे का? केले असल्यास काय उपाययोजना केल्या? याची विचारणाही आव्हाड यांनी केली आहे.आयआयटीने आपला अहवाल एमएसआरडीसीला म्हणजेच या खात्याचा कारभार सांभाळणाऱ्या पालकमंत्र्यांना सादर केला आहे. त्यामुळे जर दुर्घटना घडली, तर तेच जबाबदार असतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणे