शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

नितेश राणे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:31 IST

ठाण्यात आरक्षणासाठी २५ जुलै रोजी झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेक मराठा तरुणांची धरपकड करून अनेकांना अटक केली. काहींना संशयावरून घरातून उचलून नाहक मारहाण केली जात आहे.

ठाणे : ठाण्यात आरक्षणासाठी २५ जुलै रोजी झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेक मराठा तरुणांची धरपकड करून अनेकांना अटक केली. काहींना संशयावरून घरातून उचलून नाहक मारहाण केली जात आहे. या मारहाणीची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी आमदार नितेश राणे यांनी सोमवारी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली. कलम ३०७ मुळे या तरुणांचे करिअर उद्ध्वस्त होणार असल्यामुळे हे कलमही मागे घेण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठाण्यात बुधवारी ‘ठोक मोर्चा’ काढला होता. यावेळी बंद आणि रास्ता रोकोही झाले. मात्र, नियंत्रणाबाहेर गेलेल्या जमावापैकी काहींनी पोलिसांवर दगडफेक करून अनेक वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी ठाण्यात आतापर्यंत ४५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. अनेकांची चौकशी करून सोडण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राणे यांनी सोमवारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. सनील राजिवडे या तरुणाला चौकशीसाठी बोलावून नौपाडा पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी आमदार राणे यांच्याकडे केली. याप्रकरणीही मारहाण करणाऱ्यांवर चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. त्याला आयुक्त सिंग यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले.- सेनेने आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. आता नारायण राणे यांनी यात महत्त्वाची भूमिका घेतल्याने केवळ राणेंना श्रेय नको म्हणून सेनेनेही आरक्षणाची मागणी केली. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे कसले आले शहाणपण, असा चिमटाही त्यांनी काढला. समाजासाठी बांधीलकी असल्यामुळे आरक्षण मिळवून देण्याची राणे कुटुंबीयांचीही जबाबदारी असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे