शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या डोंगर माथ्यावर अडकलेल्या नऊ पर्यटकांची सुखरुप सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:16 IST

ठाण्याच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानामध्ये निसर्गभ्रमंतीसाठी गेलेले नऊ पर्यटक जंगलात रस्ता भरकटले. त्यांनी ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाकडे ही माहिती दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांची सुखरुप सुटका केली.

ठळक मुद्देटिकूजिनी वाडीजवळील जंगलात भरकटलेअग्निशमन दलाने घेतला शोधसुटका होताच मानले आभार

ठाणे: टिकूजिनी वाडीपासून जवळच असलेल्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या डोंगर माथ्यावर अडकलेल्या नऊ पर्यटकांची ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने अग्निशमन दलाच्या मदतीने सुटका केली. दुपारी २ ते ३ या एक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाट चुकलेल्यांना जंगलातून बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.टिकूजिनी वाडीपासून जवळच असलेल्या महाराष्टÑ वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील कल्पतरु हिल्स या मानपाडयातील संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या जंगलात सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अर्जून घोष (१५) याच्यासह नऊ जणांचा गट फेरफटका मारण्यासाठी गेला होता. दिवसभर जंगलात भ्रमंती केल्यानंतर ते दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास रस्ता चुकले आणि आत भरकटले. रस्ताच मिळत नसल्यामुळे त्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांच्यापैकीच एकाने ठाणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे ही माहिती देउन मदत मागितली. ठाणे पोलिसांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे ही माहिती दिल्यानंतर बाळकूम अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी मुल्ला मुणिर यांच्यासह आठ जणांच्या जवानांनी या तरुणांच्या गटाला आवाज देत जंगलात त्यांचा दुपारी २ वाजण्याचा सुमारास शोध घेतला. एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अखेर या पर्यटकांचा शोध लागला. त्यानंतर अर्जून याच्यासह श्रुती सरनागल (१४), कृष्णा तांडेल (१५), ओम कृष्ण कामत (१५), अक्षित माहोर (१६), अनन्या शेट्टी (१६), जॉर्डन सन्स (१६) आणि तारक मोदी (४८, रा. सर्व निळकंठ वूडर्स, ठाणे) या नऊ जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले. सुदैवाने त्यांच्यापैकी कोणीही जखमी झालेले नाही. या सर्वांनी ठाणे अग्निशमन दलाचे आभार मानले.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसforestजंगल