शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चोरांना पकडण्यासाठी स्थानिकांची रात्रीची गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 04:38 IST

मानवी साखळी : चोऱ्या वाढल्याने मानपाड्यातील तरूणांनी घेतला पुढाकार

ठाणे : मागील आठवड्यात दोन दिवसांआड घोडबंदर भागातील मानपाडा, आझादनगर भागात घरफोडीच्या घटना घडल्याने आता स्थानिकांनीच मानवी साखळी तयार करून रात्रीची गस्त सुरू केली आहे. तसेच पोलिसांनीसुद्धा या भागात रात्रीची गस्त वाढवली आहे. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती चोर सापडलेले नाहीत.

मागील आठवड्यात घोडबंदर भागातील मानपाडा भागात पहाटेच्या सुमारास चोरीच्या घटना घडल्या. येथील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. चोरट्यांनी महापौरांच्या बहिणीच्या घरावरसुद्धा डल्ला मारला होता. दोन दिवसांनी पुन्हा याच भागात चोरीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये एका फेरीवाल्याचे दुकान फोडण्यात आले आहे, तर दुसºया घटनेतही घरातून ऐवज लंपास झाला. चोरांनी मानपाडा, आझादनगर, मनोरमानगर, शिवाजीनगर या भागांंना टार्गेट केले आहे. त्यामुळे पोलिसांपुढे या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आता या चोरांना पकडण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. ४० ते ५० स्थानिक तरुण मागील तीन ते चार दिवसांपासून या भागात रात्रीची गस्त घालत आहेत.या तरुणांच्या हाती बॅटरी, स्टम्प किंवा काठी असते, जेणेकरून एखाद्याने हल्ला केला तर किमान त्याचा प्रतिक्रार करणे सोपे जाईल. या ठिकाणाच्या मुख्य प्रवेशद्वारांजवळ दोन ते तीन मुले थांबत असून एखादा अनोळखी इसम दिसल्यास त्याचा मोबाइल नंबर, घरचा पत्ता विचारला जात आहे. शिवाय, घरापर्यंत जात आहेत. काही छोट्या गल्ल्यांमध्ये विजेची व्यवस्था नसल्याने तेथील रहिवाशांना घराबाहेरील दिवे सुरू ठेवण्यास सांगितले जात आहे. तसेच घराचा दरवाजा व्यवस्थित बंद ठेवण्यास सांगितले जात आहे. पोलीससुद्धा या तरुणांच्या मदतीला गस्त देत आहेत.मागील आठवड्यात चोरीच्या घटना वाढल्याने रात्रीची गस्त सुरू केली आहे. लोकांची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे चोर सापडेपर्यंत ही गस्त सुरूच राहणार आहे.- राजेंद्र शिंदे, उपविभागप्रमुख, शिवसेना, घोडबंदर 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस