शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

खड्डेमुक्तीसाठी पुढील वर्षीचा मुहूर्त! आयुक्तांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 3:05 AM

तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख ही खड्ड्यांचे शहर म्हणून झाली आहे. यासंदर्भातील विदारक चित्र ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’च्या माध्यमातून लोकमतने समोर आणल्यानंतर पालिका प्रशासनाने याची दखल घेतली आहे.

ठाणे : तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख ही खड्ड्यांचे शहर म्हणून झाली आहे. यासंदर्भातील विदारक चित्र ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’च्या माध्यमातून लोकमतने समोर आणल्यानंतर पालिका प्रशासनाने याची दखल घेतली आहे. पालिका आयुक्तांनीसुद्धा लोकमतच्या वृत्तात तथ्य असल्याचे अधिका-यांसोबतच्या आढावा बैठकीत सोमवारी मान्य केले. या वृत्ताची दखल घेत, पुढील वर्षी ठाणेकरांचा प्रवास खड्ड्यांतून कसा टाळता येईल, यासाठीची पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले.शहरात दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, खड्ड्यांवरून वातावरण तापलेले असते. यंदा ते घडणार नसल्याचा दावा पालिकेने केला होता. परंतु, तो पावसाने खोटा ठरवला आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे दिसून आले. ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’च्या माध्यमातून रस्त्यांची खरी अवस्था जनतेसमोर आणण्याचा लोकमतने प्रयत्न केला.महापालिकेच्या सर्व्हेनुसार शहरात १६०७ खड्डे पडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचे क्षेत्रफळ ३४९४ चौमी एवढे आहे. यातील १४८३ खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाने केला असून केवळ १२८ खड्डे भरणे शिल्लक असल्याचे म्हटले आहे. परंतु, ही संख्या तिपटीने जास्तीची आहे. असे असले तरी महापालिकेने किमान शहरात रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यासाठी मोहीम उघडली आहे.- पावसाने उसंत घेतल्याने खड्ड्यांच्या डागडुजीची कामे आता वेगाने सुरू केल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली. सोमवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आढावा बैठकीत या मुद्यांवर अधिकाºयांची कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर तोडगा कसा काढता येईल, यावर अभ्यास करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील वर्षी ठाणेकरांना खड्ड्यांचा प्रवास कसा टाळता येईल किंवा ते पडले तर कोणत्या नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बुजवता येतील, यावर आतापासूनच चर्चा सुरू केली आहे.

टॅग्स :thaneठाणे