शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पुढील शनिवारी राज ठाकरे ठाणे मुक्कामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 20:18 IST

विधानसभा निवडणुकीच मतदानारूपी मिळालेल्या आर्शीवादानंतर मनसेने आता आगामी ठाणे महापालिकेची रणनीती तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.

ठाणे  - विधानसभा निवडणुकीच मतदानारूपी मिळालेल्या आर्शीवादानंतर मनसेने आता आगामी ठाणे महापालिकेची रणनीती तयार करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार येत्या 9 नोव्हेंबर रोजी मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे ठाण्यात दाखल होणार असून ते दिवसभर पदाधिकाऱ्यांशी विधानसभानिहाय बैठका घेऊन या संदर्भात चर्चा करणार आहेत. दरम्यान शनिवारी सकाळी ते आपल्या पत्नीच्या ठाण्यातील घरी दिवाळी निमित्त आले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही भुमिका घेतल्याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी दिली.ठाण्यातील पाचपाखाडी भागातील सेंटर पॉईंट येथे राज ठाकरे यांचे जवळचे नातेवाईक राहत असून त्यांच्याकडे ते आले असता यावेळी त्यांनी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी बोलताना ही माहिती दिली आहे. 9 तारखेला होणाऱ्या या बैठकीत ठाणो जिल्ह्यातील 24 विधानसभा मतदार संघाचा मतदारसंघ निहाय आढावा देखील ते घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या या पुढील भेटीमुळे ठाण्यात यानंतरच्या काळात मनसे अधिक कार्यशील होणार असल्याचे संकेत ठाकरे यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाण्यात राज ठाकरे त्यांच्या कुटुंबियांसोबत ठाण्यातील त्यांचे जवळचे नातेवाईकांकडे दिवाळीनिमित्त आले होते.ठाण्यातील तीन मतदार संघ आणि कल्याण ग्रामीण मतदार संघात मनसेने आपले उमेवार उभे केले होते. यामध्ये कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील हे राज्यातील मनसेचे एकमेव उमेवार निवडून आले आहेत. तर ठाणे शहर विधानसभा मतदार संघात जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांचा थोडक्यात पराभव झाला आहे. ओवळा - माजिवडा माजिवडा आणि कोपरी पाचपाखाडी मतदार संघातील मनसेच्या उमेदवारांनी देखील या विधानसभेच्या निकालामध्ये चांगली मते पडली असल्याचे समोर आली आहे. त्यामुळे काही का होईना मनसेच्या मतांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असल्याने आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणो जिल्ह्यात देखील लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निकालानंतर ठाणे जिल्ह्यतील सर्वच मतदार संघाचा आढावा राज ठाकरे घेणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी दिली आहे. कोणत्या मतदार संघात मनसेला किती मते मिळाली, मनसेची कोणत्या मतदार संघात ताकद आहे याचा आढावा देखील घेतला जाणार आहे.आगामी पालिकेच्या निवडणुका देखील होणार असल्याने त्या दृष्टीने मनसेच्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे स्वत: मार्गदर्शन करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ठाणो शहर मतदार संघात आणि जिल्ह्यातील जिथे जिथे मनसेचे उमेदवार उभे केले होते त्या ठिकाणी राष्ट्रवादीने या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील राष्ट्रावादीने मनसेशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे  या बैठकीत या मुद्द्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवाळी निमित्त राज ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यात त्यांचे साडू उन्मेष चव्हाण यांची भेट घेतली. ठाण्यात पाचपाखाडी येथे सेंटर पॉइंट इमारतीत राज ठाकरे यांचे साडू राहत असून बरेच दिवस भेट न झाल्याने सह परिवार बहिणीची भेट घ्यायला आली होती यावेळेस जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे यावेळी शिर्मला ठाकरे यांनी सांगितले. अमित ठाकरेने लहानपणी केलेली मस्ती याबाबत सांगताना शिर्मला यांना हसू आवरले नाही. साधारण दोन तास ही पारिवारीक भेट सुरु  होती.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेthaneठाणे