शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आईवडिलांना पाहुणचार न केल्याने नवविवाहितेची ठाण्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 21:12 IST

अगदी क्षुल्लक कारणावरुन एका नवविवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या ज्ञानेश्वरनगरमध्ये रविवारी घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस तपास करीत आहेत.

ठळक मुद्देजेवणासाठी विचारपूस न केल्याचा राग रुग्णलयात दाखल केल्यानंतर काही तासातच झाला मृत्युकुटूंबीयांमध्ये हळहळ

ठाणे : औरंगाबाद येथून ठाण्यात लेकीकडे आलेल्या सासू सास-यांना जावयाने पाहुणचारासाठी आग्रह न धरल्याच्या रागातून रविना बाबासाहेब राऊत (२२) या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ज्ञानेश्वरनगर येथे रविवारी घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्ञानेश्वरनगरातील पंचपरमेश्वर चाळीत रविना आणि बाबासाहेब हे दाम्पत्य वास्तव्याला आहे. अवघ्या वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला आहे. त्यांच्यात २ मे रोजी क्षुल्लक कारणावरून आधीच वाद झाला होता. नेमकी त्याचवेळी औरंगाबाद येथून रविनाचे आईवडिल तिला भेटण्यासाठी आले. त्यावेळी जावई त्यांच्याशी फारसे काही बोलले नाही. शिवाय, त्यांना जेवण किंवा राहण्यासाठीही त्यांनी काहीच आग्रह धरला नाही. त्यामुळे ते ३ मे रोजी पुन्हा आपल्या गावी निघून गेले. यातून पुन्हा या दाम्पत्यामध्ये पुन्हा ४ आणि ५ मे रोजी वाद झाला. याच वादातून तिने उंदीर मारण्यासाठी आणलेले विष शनिवारी रात्री प्राशन केले. आपण विष घेतल्याचे तिने पतीला न सांगता रात्री केवळ अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. त्यावर दवाखान्यात जाण्यासही तिने नकार दिला. दुसºया दिवशी ६ मे रोजी पुन्हा त्रास झाल्यानंतर सकाळीच ९ वाजण्याच्या सुमारास ते स्थानिक खासगी रुग्णालयात गेले. त्यावेळी मात्र तिने असे विष घेतल्याचे डॉक्टरांना सागितले. तिला तातडीने नौपाड्यातील ‘निपुण’ या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांनाच ६ मे रोजी रात्री ८.५० वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. घरात सासू सास-यांना राहण्यासाठी आग्रह न केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता, अशी माहिती चौकशीत समोर आल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. हा संपूर्ण प्रकार वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेला असल्याने याप्रकरणी सोमवारी (७ मे रोजी ) वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाSuicideआत्महत्या