शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सफाळे-विरार रोरो सेवेमुळे वाचले नवजात बाळाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 05:16 IST

विरार नारिंगी (चिखल डोंगरी) ते सफाळे (खारवाडेश्री) दरम्यान सुरू झालेली रोरो सेवा जीवदायिनी ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, सफाळे : सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीनंतर महिलेच्या नवजात बाळाची तब्येत मंगळवारी रात्री अचानक बिघडली. त्यामुळे बाळाला तत्काळ विरारला घेऊन जाण्यास डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा सेवेचा कालावधी संपलेला असतानाही रोरो बोट सुरू करून या बाळाला ॲम्ब्युलन्सने विरार येथे नेण्यात आले. तेथे वेळीच उपचार मिळाल्याने या नवजात बाळाचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे विरार नारिंगी (चिखल डोंगरी) ते सफाळे (खारवाडेश्री) दरम्यान सुरू झालेली रोरो सेवा जीवदायिनी ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्री अस्मिता जाधव यांच्या नवजात बाळाला श्वास घेण्यास अडचणी येत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. अशा परिस्थितीत अधिक उपचारासाठी विरारच्या रुग्णालयात मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून तातडीने पोहोचणे शक्य नव्हते. रात्री साडेदहा वाजता जेटीवर संपर्क केला असता रोरोची शेवटची फेरी सुटल्याचे सांगण्यात आले.  तेव्हा जलसारचे उपसरपंच विकोष म्हात्रे यांनी बोटीने रुग्णवाहिका तातडीने पलिकडे नेण्यासाठी जेटी व्यवस्थापकांना विनंती केली. त्यावेळी टेभीखोडावे पोलिस पाटील सुनील पाटील उपस्थित होते.

 

टॅग्स :Virarविरारpalgharपालघर