शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांच्या खैरातीवर नव्या वर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:51 IST

कल्याण : थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी केडीएमसी मुख्यालयातील सुरक्षारक्षकांनी कंत्राटदार, बिल्डरांकडून पैसे मागितल्याची तक्रार सुरू आहे.

प्रशांत माने कल्याण : थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी केडीएमसी मुख्यालयातील सुरक्षारक्षकांनी कंत्राटदार, बिल्डरांकडून पैसे मागितल्याची तक्रार सुरू आहे. पालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांकडूनही पैसे उकळल्याने त्या धसक्यापोटी दोन दिवस ते पालिकेत फिरकलेले नाहीत. त्यामुळे सध्या मुख्यालय आणि पालिका भवन परिसरात शुकशुकाट आहे.पैसे घेण्यावरून सुरक्षारक्षकांच्या दोन गटांमध्ये हमरीतुमरीचे प्रकारही याआधी घडले आहेत. दिवाळी असो अथवा गणपती-नवरात्र अशा सणांना काही जणांकडून स्वखुशीने पैसे दिले जातात. परंतु, आता गटारी आणि थर्टी फर्स्टसाठी पैशांचा तगादा लावला जात असल्याने सुरक्षारक्षकांची ही कृती चर्चेचा विषय ठरली आहे. सुरक्षा विभागाचे प्रमुख सु. रा. पवार आणि मुख्य सुरक्षा अधिकारी सुहास खेर हे सध्या रजेवर आहेत. दरम्यान, सुरक्षारक्षकांच्या पैसे उकळण्यासंदर्भात सहायक सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.राजकीय पक्षांप्रमाणे केडीएमसी मुख्यालयातील सुरक्षारक्षकांमध्येही दोन गट आहेत. एक मुख्यालयाच्या इमारतीत, तर दुसरा गट पालिका भवनात आहे. तेथे गरज नसतानाही मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. त्यांचे तेच चेहरे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ड्युटीवर दिसतात. पालिका मुख्यालयातील प्रवेशद्वारावर ते पाहायला मिळते. वरिष्ठांच्या आशीर्वादाने येथे तैनात असलेले कर्मचारी मुख्यालयाबाहेर अन्यत्र कुठेही न जात मोक्याच्या ठिकाणी ड्युटी घेण्यात यशस्वी होतात. कार्यालयीन वेळेत दाटीवाटीने कर्तव्य बजावणारे हेच रक्षक दुसरा, चौथा शनिवार आणि रविवारी दिसतही नाहीत. या दिवशी खाजगी वाहनचालक मुख्यालयाच्या आवाराचा पार्किंग म्हणून वापर करत असल्याने अक्षरश: सुरक्षेचे तीनतेरा वाजतात. कार्यालयीन वेळेनंतर बाहेरील नागरिकांना मुख्यालयात प्रवेश नाही. तरीही काही कंत्राटदारांना तसेच ‘जागरूकते’चा वसा घेतलेल्या काही नागरिकांना मात्र सुरक्षारक्षक प्रवेश देतात. काही वर्षांपूर्वी एका हत्येतील आरोपीने त्याची मोटारसायकल पालिका आवारात उभी केल्याचे बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासात समोर आले होते.>वेतन मिळत असताना ही कृती योग्य नाहीआम्ही महापालिकेत कामासाठी येतो. आधीच कामांच्या थकीत बिलांमुळे हैराण असताना आमच्याकडे थर्टी फर्स्टच्या नावाखाली पैशांचा तगादा लावला जात आहे, हे चुकीचे आहे.दिवाळीच्या वेळी खुशीने पैसे आम्ही देतोही, पण आता गटारी असो अथवा थर्टी फर्स्टसाठी पाठीमागे लावला जात असलेला ससेमिरा पाहता, अशा वेळी महापालिकेत न गेलेलेच बरे, असे वाटते.सुरक्षारक्षकांना वेतन मिळतानाही त्यांची जी कृती सुरू आहे, ती योग्य नाही, असे कल्याणमधील एका कंत्राटदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण