शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 1844 रुग्णांची नव्याने वाढ, 25 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 20:00 IST

नवी मुंबई महापालिकेत 359 रुग्णांची तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 29 हजार 914 झाली आहे. तर, मृतांची संख्या 650 वर गेली आहे

ठळक मुद्देनवी मुंबई महापालिकेत 359 रुग्णांची तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 29 हजार 914 झाली आहे. तर, मृतांची संख्या 650 वर गेली आहे

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार नव्या 844 रुग्णांची शुक्रवारी नव्याने वाढ झाली आहे.  त्यामुळे आज जिल्ह्यातील रुग्ण संंख्या एक लाख 42 हजार 93 झाली आहे. तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता तीन हजार 867 झाली आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे 379 रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात 29 हजार 463  कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर आज ही पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे आजपर्यंत 885 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात 588  रुग्णांची आज वाढ झाली असून सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 34 हजार 108 रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या 715 झाली आहे. 

नवी मुंबई महापालिकेत 359 रुग्णांची तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 29 हजार 914 झाली आहे. तर, मृतांची संख्या 650 वर गेली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात आज एकाचा मृत्यू झाला आहे. तर 25 नवे रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत मृतांची संख्या 246 तर बाधीत रुग्ण आठ हजार 168 झाले आहेत. भिवंडी महापालिका क्षेत्रात आज 25 बधीत आढळून आले. तर आज एकाचा मृत्यू झाला आहे.  आता बाधितांची संख्या चार हजार 434 झाली असून मृतांची संख्या 295 झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये आज 193 रुग्णांची तर, चार जणांच्या  मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या 14 हजार 789 झाली, तर, मृतांची संख्या 464 झाली आहे. 

अंबरनाथमध्ये आज 42 रुग्णांची वाढ तर, दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आज बाधितांची संख्या पाच हजार 396 झाली. तर, मृतांची संख्या 203 वर गेली आहे. बदलापूरमध्ये 82 रुग्णांची आज नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या चार हजार 828 झाली. या शहरात आज एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या 73 झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात 151 रुग्णांची वाढ झाली. आज दोघांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या दहा हजार 993 आणि मृतांची संख्या आजपर्यंत 336 आहे.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या