शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शिखरावर असताना कधीही अहंकार करू नका- मंदार भारदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:05 IST

लोक काय म्हणतील, हा विचार मनातून काढा; उलगडला विमान कंपनीचा प्रवास

ठाणे : शून्यावर असताना अनेक मोह, फसवे सापळे असतात, शॉर्टकट असतात. त्यातून वेळीच सुटका केली तर शिखर गाठणे सोपे होते. त्यामुळे शून्यावर असताना खंत, तर शिखरावर असताना अहंकार करायचा नाही, असा सल्ला विमान कंपनीचे संचालक मंदार भारदे यांनी दिला.ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शनिवारी भारदे यांनी त्यांच्या विमान कंपनीचा प्रवास उलगडला. यावेळी त्यांना ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी बोलते केले. भारदे पुढे म्हणाले की, या व्यवसायाविषयी सुरुवातीला काहीच माहिती नव्हती. राज्यातील काही मंत्र्यांना सेवा देण्यास सुरुवात केली.आज सर्व राजकारणी, कलाकार यांना मी सेवा देत आहे. यादरम्यान आहे त्या स्थितीत शांत राहून काम कसे करावे, हे मी काही नेत्यांकडून शिकलो. आता आम्ही स्वत:चे एअर लाईन परमिट काढले असून लवकरच स्वत:च्या कंपनीची एअरलाइन अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करणार आहोत. त्यात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांतील रुग्णांना त्याद्वारे माफक दरात सेवा देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.आयुष्यात लोक काय म्हणतील, याचा विचार बाजूला सारला तर तिथून नवनिर्मितीला सुरुवात होते. आपण ज्यांना घाबरत असतो त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर अधिक वेगाने प्रगती करता येते. अंतिम ध्येयापेक्षा त्यासाठी झालेला प्रवास हा अधिक रंजक असतो. त्यामुळे शून्यावरून शिखरावर जाताना खूप मजा येते. मात्र, या प्रवासात शॉर्टकट न घेता वाटचाल केल्यास ध्येय निश्चित साध्य होते असेही ते म्हणाले.‘एक्स्प्लोर मराठा’ असा रूटहेलिकॉप्टरमधून सह्याद्री पर्वतरांग खूप वेगळी आणि भव्य दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आकाशातून पाहून राजांची व्हिजन समजते. त्यामुळे आपल्याकडील गडकिल्ल्यांची संपदा परदेशी नागरिकांना दाखवण्यासाठी आम्ही ‘एक्स्प्लोर मराठा’ असा रूट तयार केला आहे.परदेशी नागरिकांना हेलिकॉप्टरमधून गडकिल्ले दाखवतो. भविष्यात दुर्गम डोंगराळ भागात वृक्षारोपण करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून सीड बॉम्बिंग करण्याचा मानस भारदे यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :thaneठाणे