शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

धक्कादायक! पुतण्याने सख्या काकीची चाकूने वार करत केली हत्या

By धीरज परब | Updated: November 1, 2023 12:42 IST

मीरारोडच्या क्वीन्स पार्क भागात पुतण्याने काकीवर चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे .

मीरारोड - मीरारोडच्या क्वीन्स पार्क भागात पुतण्याने काकीवर चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे . नवघर पोलिसांनी आरोपीला तासा भरात अटक केली आहे . 

क्वीन्स पार्क भागात क्वीन्स ऍव्हेन्यू इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शबाना खान ( ३१ ) यांची राहत्या घरात त्यांचा पुतण्या दिशान खान ( २० ) ह्याने मंगळवारी दुपारी चाकूने गळा, पोट आदी भागावर वार करून निर्घृण हत्या केली.  यावेळी शबाना यांचा ११ वर्षांचा मुलगा घरीच होता . 

सहायक पोलीस आयुक्त उमेश माने - पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दिड ते दोनच्या सुमारास हि घटना घडली . शबाना यांच्यावर वार करून दिशान हा पळून गेला होता . मात्र पोलिसांनी त्याला शोधून अटक केली . हत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसून पोलीस तपासात कळेल असे ते म्हणाले . 

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शबाना ह्या इमारतीतील एका विंगच्या दुसऱ्या मजल्यावर तर दिशान हा लगतच्या विंग मधील चौथ्या मजल्यावर भाड्याने राहतो . दिशान हा भाईंदर पश्चिम येथील एका खाजगी कंपनीत काम करतो . त्याचे शबाना व कुटुंब सोबत कौटुंबिक करणातून वादविवाद होत होते . त्याच रागातून मंगळवारी दुपारी दिशान ह्याने शबाना यांच्या घरी जाऊन तिच्या ११ वर्षांच्या मुलावर चाकू टेकवला . ते पाहून शबाना मुलास वाचवण्यासाठी धावून गेल्या असता दोघां मध्ये झटापट होऊन चाकूने शबाना वर अनेक वार केले .   त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या नंतर दिशान हा तिकडून निघून गेला होता . ह्यात दिशान ला सुद्धा चाकू लागून जखम झाली आहे. 

तिकडून दिशान हा पुन्हा कामाच्या ठिकाणी गेला. दरम्यान हत्येच्या घटने नंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पवार व पथकाने तपास करत तासा भरात आरोपीला अटक केली. दिशान ह्याच्या आईचे शबाना व कुटुंबा सोबतच्या भांडणाचा राग  त्याला होता. रागाच्या भरात त्याने मध्यप्रदेश , ग्वाल्हेर येथील गावी आजोबांना सुद्धा जखमी केल्याचे सांगितले जाते.