शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मामाकडून एक कोटीची खंडणी उकळणाऱ्या भाच्याला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: February 15, 2024 20:35 IST

ठाणे खंडणी विराेधी पथकाची कारवाई: एसीबीमध्ये तक्रार करण्याची दाखविली भीती.

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : एमआयडीसीतून मुख्य अभियंता या पदावरून निवृत्त झालेल्या मामाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) भीती दाखवत त्याच्याकडून एक काेटीची खंडणी उकळणाऱ्या मंगेश अरुण थोरात (२९, रा. पाइपलाइन रोड, यशाेदानगर, सावेडी रोड, अहमदनगर) या भाच्याला ठाणे खंडणी विराेधी पथकाने अटक केल्याची माहिती पाेलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठाण्याच्या पाचपाखाडी भागातील रहिवासी सुभाष तुपे (५९) हे एमआयडीसीतून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी जयश्री तुपे यांनी एमआयडीसीमधूनच कार्यकारी अभियंता पदावरून राजीनामा दिला आहे. तुपे दांपत्याने त्यांचा भाचा मंगेश याला व्यवसायासाठी ६१ लाख रुपये दिले होते. तसेच, या दाम्पत्याने पुनीत कुमार (रा. उत्तर प्रदेश) याच्याकडे व्यवसायाच्या निमित्ताने एक काेटी २५ लाखांची गुंतवणूक केली हाेती. यासंदर्भात करारही केला होता. परंतु, पुनीत कुमार हा त्यांना पैसे परत देत नव्हता. त्यामुळे तुपे दांपत्याने हे पैसे काढून देण्यासाठी त्यांचा भाचा मंगेशकडे हा करार देऊन काही रक्कमही दिली होती.

जयश्री यांनी मंगेशला दिलेल्या करारनाम्याचा त्याने गैरफायदा घेऊन तसेच संभाषण रेकाॅर्डिंगचा आधार घेत २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान तुपे दाम्पत्याला एसीबीमध्ये तक्रार आणि बदनामीची तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. तर, आरोपीला दिलेले उसने पैसे परत मागू नये म्हणून त्याने दाम्पत्याकडे एक कोटीच्या खंडणीची मागणी केली होती.

याप्रकरणी तुपे यांनी ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली. ती दाखल होताच ठाणे खंडणी विरोधी पथकाने उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक शेखर बागडे, वनिता पाटील, सहायक पाेलिस निरीक्षक भूषण कापडनीस, सुनील तारमळे, उपनिरीक्षक विजयकुमार राठोड आदींच्या पथकाने मंगेशला १४ फेब्रुवारी राेजी खारघर टोलनाका भागात एक काेटीच्या खंडणीची रक्कम घेताना अटक केली. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी