शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीच्या जांघेत अडकली सुई! कळवा रुग्णालयातील प्रकार, जेजे रुग्णालयात हलविले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 05:28 IST

डॉक्टर, इतका निष्काळजीपणा कसा करू शकतात?

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  कळवा रुग्णालयात न्यूमोनियाच्या उपचाराकरिता दाखल असलेल्या एका तीन वर्षांच्या मुलीच्या जांघेत गाइड वायर (सुई) अडकल्याची अत्यंत गंभीर बाब उघड झाली आहे. जांघेत अकडलेली सुई काढण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र, ही शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात संबंधित सर्जन नसल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे तिला मुंबईतील जेजे रुग्णालयात हलविण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी याच कळवा रुग्णालयात एका रात्रीत १७ जणांचा मृत्यू झाला होता. याबाबतचा चौकशी अहवाल शासनाने दडपला आहे.

तीन वर्षांची ही मुलगी साधारणपणे एक महिन्यापूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. तिला न्यूमोनिया झाला होता. तिची प्रकृती अंत्यत खालावली असल्याने तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. यावेळी तिला सलाइन लावण्यासाठी हाताची शीर सापडत नसल्याने, तिला सेंट्रल लाइन टाकावी लागणार होती. त्यासाठी डॉक्टरांनी तिच्या पायाच्या शिरेतून  सुई घालून तिच्यावर उपचार सुरू केले. 

मात्र जांघेत गाइड वायर (सुई) अडकली. ती अद्याप काढता आलेली नाही. त्यावेळी तिची प्रकृती नाजूक असल्याने तिच्या पायातील सुई काढता येणे शक्य नव्हते, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. गाइड वायर सरळ असते. ती रुग्णांच्या शरीरात एक ते दीड महिना राहिल्यास काही धोका पोहोचत नसल्याचा दावा त्यांनी केला.  

डॉक्टर, इतका निष्काळजीपणा कसा करू शकतात?

या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी व्टीट करत कळवा रुग्णालयाच्या कारभारावर टीका केली आहे. मुलीवर उपचार करताना पायातील जांघेत सुई तुटली असून, १६ दिवसांनंतरदेखील ती काढण्यात आलेली नाही. त्याकरिता आवश्यक सर्जन रुग्णालयात नाही. मुलीचा पाय सुजायला सुरुवात झाला आहे. त्यात मुलीचे काही बरेवाईट झाले, मुलीचा पाय कापावा लागेल. इतका निष्काळजीपणा डॉक्टर कसा काय करू शकतात, असा सवाल आव्हाड यांनी केला.

गाइड वायर काढण्यापेक्षा त्या मुलीचा जीव वाचवणे महत्त्वाचे होते. त्यानुसार मुलीवर योग्य उपचार करण्यात आले. आज ही मुलगी व्हेंटिलेटवर आणि ऑक्सिजनशिवाय श्वासोच्छ्वास घेत आहे. तिची प्रकृती उत्तम आहे. मुलीच्या शरीरातील गाइड वायर काढण्यासाठी लागणारे सर्जन उपलब्ध नसल्याचे तिला जेजे रुग्णालयात पाठवावे लागणार असल्याची कल्पना मुलीच्या पालकांना दिली आहे. - डॉ. अनिरुद्ध माळगावकर, अधीक्षक, कळवा रुग्णालय 

टॅग्स :kalwaकळवाhospitalहॉस्पिटल