शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेद प्रसारासाठी अधिक प्रयत्नांची गरज, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 09:57 IST

आयुष मंत्रालयातर्फे ‘आयुर्वेद सर्वांसाठी - जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन’ या विषयावर ठाण्यात आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि एआयएसी कॉन, २०२४ चा प्रारंभ नाईक यांच्या हस्ते झाला.

ठाणे : विश्वात अनेक चिकित्सा आहेत, परंतु आयुर्वेद ही पद्धती विशेष आहे. आणखी प्रयत्न केल्यास जगात आयुर्वेदाचा आणखी प्रसार होईल, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे केले.

आयुष मंत्रालयातर्फे ‘आयुर्वेद सर्वांसाठी - जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन’ या विषयावर ठाण्यात आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि एआयएसी कॉन, २०२४ चा प्रारंभ नाईक यांच्या हस्ते झाला.

आधुनिक जीवन व वेद अर्थात ज्ञान, तसेच जीवन कशा प्रकारे जगायचे, हे सांगणे म्हणजे आयुर्वेद होय. आधुनिक जीवन जगताना मूळ सिद्धांतावर यावेच लागेल. कोरोनासारखे अनेक शत्रू यापुढेही हल्ला करण्यास सज्ज आहेत, अशा वेळी आयुर्वेद सक्षम करणे गरजेचे आहे, असे नाईक म्हणाले. 

महाविद्यालय बंद होणार?भारतात सर्वांत जास्त आयुर्वेदिक महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे येथे एक स्वतंत्र आयुर्वेदिक विद्यापीठ व्हावे, तसेच प्रत्येक बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात आयुर्वेदाचा समावेश होणे गरजेचे आहे, असे मत महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी व्यक्त केले. मरिन ड्राइव्ह परिसरातील बंद होण्याच्या मार्गावरील जुने मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालयाकडे लक्ष देऊन, ती जागा आयुर्वेदाच्या कामासाठी उपयोगात आणावी, अशी विनंती त्यांनी केली. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर आयुषच्या माध्यमातून काही सुयोग्य हस्तक्षेप करून होणारे दीर्घकालीन नुकसान रोखण्याचा प्रयत्न आहे, असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले.   

टॅग्स :thaneठाणे