शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन, काढला बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 16:15 IST

केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा गोर गरीब जनतेच्या हिताचा नसून हा अर्थसंकल्प गोर गरीब जनतेला लुटण्याचा प्रकार असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने बैल गाडीवरुन मोर्चा काढून अनोखे आंदोलन केले.

ठळक मुद्देचुलीवर केलेले अन्न केले ग्रहणमुंब्य्रात निघाला मोर्चा

ठाणे - केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प गरीबांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांवर घाव घालणारा आहे. पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या किंमती वाढविल्याने दूध, भाज्या यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. इंधनावर सेस टॅक्स वाढविल्याने त्याचा परिणाम गरिबांच्या अन्नावर झाला आहे. हा अर्थसंकल्प देशातील शेतकरी, मजूर, लहान व्यापारी, मध्यमवर्गीयांवर अन्याय करणारा आहे. याचाच अर्थ भाजप सरकार गरिबांच्या विरोधातील सरकार असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सायकल आणि बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकर्त्यांनी चक्क चूल पेटवून त्यावर अन्न शिजवले.                    केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंब्रा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. केंद्राने नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्या अर्थसंकल्पाला गरिबांच्या आणि देशाच्या विरोधातील अर्थसंकल्प मानून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंब्रा तहसीलदार कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून आणि चुलीवर स्वयंपाक बनवून केंद्राचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाचे आयोजन कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान आणि युवक अध्यक्ष शानु पठाण यांनी केले होते. हे सरकार देश आणि गरिबांच्या विरोधातील आहेच, पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील व्यापारी, कारखानदार वर्गही देशोधडीला लागत आहे. आई वडीलांनी मोठ्या कष्टाने मुला मुलींना शिक्षण देऊन उच्च शिक्षित केले आहे. मात्र या मुलांसमोरचे भविष्य अंधकारमय झाले आहे. देशाचे पंतप्रधान अशा मुलांना पकोडे विकायला सांगत आहेत. रस्त्यावर हातगाड्या लावून पकोडे विकण्यासाठीच आम्ही मुलांना शिक्षित केले आहे का? असा सवाल उपस्थित करीत आमदार आव्हाड यांनी मोदी यांच्या चुकीच्या धोरणांचा निषेध केला. तर राज्याचे सरकार चालविणाºया फडणवीस सरकारचा समाचारही घेतला. देशात आणि राज्यात जातीय द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. विरोधकांची पोलिसांच्या बळावर मुस्कटदाबी केली जात आहे. विरोधकांवर जरब बसावी म्हणून भुजबळ यांच्यासारख्यांना कारागृहाच्या बाहेर येऊ दिले जात नाही. हे सरकार सत्तेवर येताच देशाच्या संविधानाला धोका निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान यावेळी चुलीवर बनविण्यात आलेले अन्न भक्षण मोर्चेकर्त्यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस