शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विंग कमांडर अभिनंदनच्या सुटकेसाठी राष्ट्रवादीची महाआरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 17:06 IST

ठाणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने विंग कमांडर अभिनंदन यांच्या घर वापसीसाठी गुरुवारी महाआरती आयोजित केली होती. यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग यात सहभागी झाला होता.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांनी दिल्या भारत माता की जय च्या घोषणाभारताने पाकीस्तानवर दबाव टाकावा

ठाणे - विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने आपल्या ताब्यात घेतले आहे. जिनीव्हा करारानुसार त्यांना मुक्त करणे गरजेचे असतानाही पाकने त्यांना डांबून ठेवले आहे. पाक सरकारला सुबुद्धी यावी आणि त्यांनी अभिनंदन यांना मुक्त करावे, तसेच, सीमेवरील जवानांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गणेशवाडी येथील तुळजाभवानी मंदिरात आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच ॠता आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती करण्यात आली.                 पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग २१ विमान कोसळले असून या विमानातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकच्या लष्कराने आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यांना मारझोड करण्याचा व्हीडीओही जारी करण्यात आलेला आहे. पाकच्या ताब्यातून त्यांची विनाइजा सुटका व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ही महाआरती केली. या महाआरतीला सर्वधर्मीय नागरिक -कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या महाआरतीला महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे ‘भारतमाता की जय, वंद मातरम, जय जवान.. जय किसान अशा घोषणा दिल्या. या महाआरतीच्या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या हातामध्ये अभिनंदन वर्थमान यांचे छायाचित्र तसेच भारताचा राष्ट्रध्वज घेतले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जवानांच्या सुरक्षेसाठीही तुळजाभवानीकडे करु णा भाकली.यावेळी बोलताना आनंद परांजपे यांनी, विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे पाकिस्तानच्या हल्लेखोर विमानांना परतवून लावताना पाकच्या ताब्यात सापडले आहेत. त्यामुळे त्यांना सोडवून मायदेशी आणण्यास मोदी सरकारने प्राथमिकता दिली पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर जेवढे प्रयत्न करणे शक्य आहेत, तेवढे प्रयत्न करावेत, पाकिस्तानवर दबाव निर्माण करावा, असे सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस