शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत टोरंटो कंपनीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 03:23 IST

राज्य सरकारने २००७ मध्ये टोरंटो कंपनीस शहरात वीजपुरवठा करणे आणि वीजबिलवसुलीसाठी फ्रेन्चायसी दिली. शहरात वीजचोरीचे प्रमाण वाढून वीजथकबाकी वाढल्याने

भिवंडी : राज्य सरकारने शहरातील वीजपुरवठा आणि वीजबिलवसुलीसाठी टोरंटो कंपनीला ११ वर्षांपासून फ्रेन्चायसी दिली असून कंपनीविरोधात तक्रारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी धामणकरनाका ते अंजूरफाटा येथील कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. कंपनीच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी पक्षातर्फे निवेदन देण्यात आले.

राज्य सरकारने २००७ मध्ये टोरंटो कंपनीस शहरात वीजपुरवठा करणे आणि वीजबिलवसुलीसाठी फ्रेन्चायसी दिली. शहरात वीजचोरीचे प्रमाण वाढून वीजथकबाकी वाढल्याने राज्य सरकारला हे पाऊल उचलणे भाग पडले होते. कंपनीच्या हातात कारभार गेल्यानंतर शहरातील वीजचोरीचे प्रमाण नियंत्रणात आले. भरारी पथकाने तीन महिन्यांत पाच हजार ग्राहकांवर वीजचोरीच्या केस दाखल झाल्याची माहिती कंपनीच्या अधिकाºयांनी दिली.राष्ट्रवादी काँग्रेसने फोटोच्या आधारे वीजग्राहकांविरुद्ध दाखल केलेले वीजचोरीचे गुन्हे मागे घ्यावेत. मान्यताप्राप्त कंपनीचे वीजमीटर बसवण्याची परवानगी देण्यात यावी. वीजचोरीच्या रकमेची आकारणी बंद करावी. कोणतीही लेखी सूचना न देता वीजग्राहकाची वीज खंडित करून त्याच्या अनुपस्थितीत वीजमीटर काढून घेऊन जाऊ नये. वीजग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण त्वरित करावे आदी तक्रारींसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अंजूरफाटा येथील टोरंटो कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष खालीद गुड्डू, प्रदेश निरीक्षक नसीम सिद्दीकी, अनिल फडतरे, भगवान टावरे, वसीम खान, कमलाकर टावरे आदी सहभागी झाले होते. अंजूरफाटा येथे महावितरणचे मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण व भिवंडीतील नोडेल अधिकारी रवींद्र बेलोस्कर यांनी मोर्चेकºयांचे निवेदन स्वीकारले. मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस