ठाणे- पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं तीव्र निदर्शने केली आहेत. केंद्र आणि राज्यात असलेल्या भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तिरडीवर दुचाकी गाडी ठेवून पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला आहे. फडणवीस नाही, तर फसवणीस सरकार मुर्दाबादच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घोषणा देण्यात आल्यात.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 15:30 IST