शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका बरखास्त करण्याची राष्ट्रवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 17:32 IST

स्थायी समिती सदस्यांची निवड चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याच्या विरोधात राष्ट्रवादीने आवाज उठविला आहे. या विरोधात आता न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तर महापालिका बरखास्त करतांनाच उपमहापौरांचे पदही रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देउपमहापौरांचे पद रद्द कराप्रशासन सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले

ठाणे - स्थायी समितीमध्ये पुन्हा सत्ताधारी शिवसेनेने चुकीच्या पध्दतीने सदस्यांची निवड केली आहे. यामध्ये भाजपने सुध्दा त्यांना साथ दिली आहे. परंतु हे केवळ आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच जाणून बुजुन ही निवड करण्यात येऊन यातून केवळ निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी आखला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच या निवडीबाबत उपमहापौरांनीसुध्दा आक्षेप घेतला नसल्याने त्यांचे पद रद्द करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मागील २०१२ पासून शिवसेनेकडून अशा पध्दतीने चुकीचा कारभार केला जात असल्याने महापालिकाच बरखास्त करण्यात यावी अशी मागणीही शासनाकडे केली जाणार असून याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.              ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई, शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते. स्थायी समिती सदस्यांची निवड मागील आठवड्यात करण्यात आली. परंतु शिवसेनेने पुन्हा चुकीच्या पध्दतीने ही निवड केली असल्याचा आरोप करीत यामध्ये प्रशासनसुध्दा सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. २०१२ पासून सत्ताधारी चुकीच्या पध्दतीने कायद्याची पायमल्ली करीत असून शासनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता ज्या पध्दतीने स्थायी समिती गठीत करण्यात आली आहे, त्याविरोधात आम्ही आवाज उठविणार हे सुध्दा सत्ताधाऱ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे स्थायी समितीचे घोंगडे भिजत ठेवून सर्व प्रस्ताव महासभेच्या पटलावर नेऊन तेसुध्दा गाई गडबडीत, गोंधळात मंजुर करण्याचा घाट टेंभी नाक्यावरील आदेशावरुन केला जाणार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे स्थायीचा जो चुकीचा ठराव झालेला आहे, तो मंजूर करायचा की नाही, याबाबतची भुमिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना घ्यायची असून त्यांनी सत्ताधाऱ्यांचा हा डाव उधळून लावला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान स्थायी समिती सदस्यांची निवड करतांना, उपमहापौरांनी चुकीच्या पध्दतीने नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे त्यांचे पद रद्द करण्यात यावे आणि सत्ताधाऱ्यांकडून जी काही कायद्याची पायमल्ली केली जात आहे, त्यानुसार महापालिकाच बरखास्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस