शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात भाजपा सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन, शेकडो कार्यकर्ते, फेरीवाले सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 17:10 IST

भाजप सरकराच्या विरोधात सोमवारी शहर राष्ट्रवादीच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेकडो पदाधिकारी, फेरीवाले सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसरकारचा पापाडा घडा भरला - आव्हाडसर्वच पातळ्यांवर सरकार अपयशी

ठाणे - महागाई, शेतकरी आत्महत्या, मराठा- धनगर- मुस्लीम आरक्षण आदी सर्वच आघाड्यांवर या सरकारने जनतेची पिळवणूकच केली आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. तीन वर्षे शांततेत गेली असतानाच आता सर्वच घटकांची पिळवून या सरकारकडून केली जात आहे. त्यामुळेच आता भाजप- सेनेच्या सरकारच्या पापाचा घडा भरला असून त्यांना जनता धडा शिकवेल, अशी टिका यावेळी आव्हाड यांनी केली.राज्य सरकारने २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यात कमालीची दिरंगाई होत आहे. त्यासोबतच बेरोजगारी, नागरी भागातील प्रश्न सोडवण्यास सरकारला अपयशच आले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे; आरक्षणाच्या मुद्यावर सरकारकडून दिशाभूल केली जात आहे, आदी मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ठाण्यात हा मोर्चा काढण्यात आला. गडकरी रंगायतनपासून सुरु झालेला हा मोर्चा मासुंदा तलावाला वळसा घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित करण्यात आला. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या फेरीवाले, पोतराजांनी आत्मक्लेश करु न सरकारचा निषेध केला. तसेच, या मोर्चात हातगाडीवर भाज्या ठेऊन महागाईचाही निषेध करण्यात आला. 

 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcollectorतहसीलदार