शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने राज्यपालांना पाठविली संविधानाची प्रत; संविधानिकपदाची करून देणार जाणीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 07:58 IST

आनंद परांजपेंची माहिती

ठाणे :  संविधानिकपदावर विराजमान असतानाही संविधानाने सांगितलेल्या ‘धर्मनिरपेक्ष’ तत्त्वांचा विसर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पडला आहे, असा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना बुधवारी संविधान तसेच प्रास्ताविकेची लॅमिनेट प्रत स्पीड पोस्टाने पाठविली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘हिंदुत्ववादी’ असूनही गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील देवदेवतांना बंदीत ठेवले आहे. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की, तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात? असा सवाल राज्यपालांनी केला होता. त्यांच्या या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी ठाणे शहराच्या मुख्य टपाल कार्यालयात एकत्र येऊन ‘संविधानाचा विजय असो’, अशा घोषणा देऊन राज्यपालांना संविधानाची प्रत स्पीड पोस्टद्वारे पाठविली. यावेळी आनंद परांजपे यांनी सांगितले की, महामहिम राज्यपालांना आम्ही भारतीय संविधान सविनय सादर करीत आहोत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. कदाचित, त्यांना या संविधानाचा विसर पडला असेल की काय, म्हणूनच भारतीय  प्रास्ताविका त्यांना पाठवत आहोत.

यावेळी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा सुजाता घाग, विक्रम खामकर, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, विधानसभा कार्याध्यक्ष विक्रांत घाग, सामाजिक न्याय विभागाध्यक्ष कैलास हावळे, सरचिटणीस रवींद्र पालव आदी उपस्थित होते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी