शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

फेसबुक पोस्टवर राष्ट्रवादीचा अधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 02:59 IST

व्हॉट्सअ‍ॅपवरही व्हिडीओ माध्यमातून प्रचार

ठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीत दोन प्रमुख पक्षांमध्ये निवडणुक होत आहे. त्यामध्ये शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी असा सामना रंगत आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी सोशल मिडियावर जास्तीचा भर दिल्याचे त्यांच्या फेसबुक पेज आणि व्हॉट्स अ‍ॅपवरील पोस्टवरुन स्पष्ट होत आहे. यासाठी वॉर रुमसुध्दा सज्ज ठेवण्यात आले असून रोज १२ ते १५ तास काम या रुममधून सुरु आहे.तरुण मतदारांना आर्कषित करण्यासाठी आणि त्यांची मते मिळविण्यासाठी सोशल मिडियाचा वापर हा मागील काही वर्षात वाढला आहे. आता लोकसभा निवडणुकीतही सोशल मिडियाचा आधार घेतला जात आहे. ठाणे लोकसभेचे राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचे फेसबुकला सध्या दोन पेज कार्यरत असून दिवसातून त्यावर २० हून अधिक पोस्ट, व्हिडीओ पडत आहेत. यामध्ये उमेदवाराचा इन्टरव्ह्यु, त्यांच्या नेत्यांच्या मुलाखती आदी सुध्दा फेसबुकला टाकले जात आहे. आनंद परांजपे यांच्या आॅफीशल पेजला सध्या ३६ हजार ५८० लाईक्स मिळाल्या आहेत. तर प्रत्येक पोस्टला २ ते अडीच हजार लाईक्स मिळत आहेत. तर दुसऱ्या पेजला मात्र तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. फेसबुक बरोबर व्हॉट्सअ‍ॅपवर सुध्दा रोजच्या रोज प्रचार फेरी, चौक सभा, व्हिडीओ आदी विषय पोस्ट केल्या जात असून याचा आकडा ८ ते १० च्या घरात आहे.कशी चालते यंत्रणा?संपूर्ण मतदार संघाची माहिती रोजचे रोज अपडेट केले जात आहे. कोणत्या मतदार संघात किती मतदार आहेत. फेसबुकच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे.प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून केल्या जाणाºया टिकेला प्रतिउत्तर तत्काळ दिले जात आहे. शिवाय व्हिडीओच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे.या वॉररुममध्ये ८ ते १० लोक काम करीत असून दिवसातील १२ ते १५ तास केले जात आहे. मतदारांचा डाटा तयार करणे, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकला पोस्ट टाकणे.36,580 लाइक्स राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या फेसबुक पेजला आहेत. त्यांच्या पेजवरून रोज १५ ते २० पोस्ट टाकल्या जातात. दररोजच्या दौऱ्यांचे अपडेट्सही दिले जातात.12542 जणांना परांजपे यांच्या वॉर रूमच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या रोज पोस्ट पाठवल्या जातात. त्यातील अनेक कार्यकर्ते या पोस्ट नंतर व्हायरल करतात.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस