शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

'आमचं ठरलंय..'; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाडांचे एकमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 08:05 IST

आपला प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप असून, त्याचा पाडाव करण्याकरिता महाविकास आघाडी आवश्यक : जितेंद्र आव्हाड

ठाणे  : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाआघाडी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी शनिवारी बैठकीत केली. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता महाविकास आघाडी व्हावी, अशीच सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांविरोधात कोणीही बोलू नये, असे आमचे ठरले आहे. समोरुन कोणी काही बोलले तरी प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असे नाही. आपला प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप असून, त्याचा पाडाव करण्याकरिता महाविकास आघाडी आवश्यक आहे, असे प्रतिपादन जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केले.         

आघाडीचा निर्णय घेण्यास आव्हाड यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर ते बोलत होते. महाराष्ट्रात एकत्र येऊन राज्य पातळीवर एकमेकाला साह्य करत भाजपविरुद्ध आपण लढत आहोत. जसे संजय राऊत यांच्या बाजूने सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत किंवा शरद पवार हे जसे वारंवार सर्वच नेत्यांची बाजू लढवत आहेत. त्याचधर्तीवर राज्यभर पक्षविरहीत वातावरण राज्यात निर्माण व्हायला हवे, ही सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. 

शिवसेनेशी चर्चा करणार का, या प्रश्नावर आव्हाड म्हणाले की, आम्ही आमची भूमिका मांडली आहे. आमच्यातर्फे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे हे चर्चा करणार आहेत. शिवाय, या चर्चेसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर तीन ते चार जणांची समिती नेमण्यात आली आहे. तीन ते चार दिवसांपासून एकनाथ शिंदे ज्या मुलाखती देत आहेत; त्याकडे पाहता, ते महाविकास आघाडीकरिता सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

दोन्ही पक्षांत हवे सामंजस्य - शिंदेराज्यात महाविकास आघाडी आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीत आम्ही आघाडीच्याच बाजूने आहोत. आमच्याकडून टीकेला सुरुवात केली गेली नव्हती. समोरुन टीका होत असेल तर त्याला प्रत्युत्तर द्यावे लागते. त्यामुळे सर्वांनी सांभाळून बोलावे, सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMahavikas Aghadiमहाविकास आघाडी