शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

मीरा-भाईंदरच्या मोबदल्यात राष्ट्रवादी करणार ठाणे विधानसभेवर दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:25 IST

लोकसभा निवडणुकीच्या सोयीसाठी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने पाणी सोडले आहे. हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्याची घोषणाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुरुवारी केली.

- अजित मांडकेठाणे : लोकसभा निवडणुकीच्या सोयीसाठी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने पाणी सोडले आहे. हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्याची घोषणाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुरुवारी केली. आता त्या मोबदल्यात ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने चालवली आहे. युतीपाठोपाठ आता आघाडीतही देवाणघेवाण सुरू झाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.ठाणे लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शिवसेनेने भाजपाच्या नाराज नगरसेवकांची समजूत काढण्यात यश मिळवले असले, तरी त्यातील २१ नगरसेवकांचे अद्यापही मनोमिलन झालेले नाही. एकेक अडचण दूर करून शिवसेना आपली रणनीती आखत असताना, राष्टÑवादीनेसुद्धा हम भी आपसे कम नही, असे म्हणत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यानुसार, गुरुवारी मीरा-भार्इंदरमध्ये राष्टÑवादीने पत्रकार परिषद घेत, मीरा-भार्इंदरची संपूर्ण जबाबदारी ही काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांच्यावर सोपवली असल्याचे स्पष्ट केले. राष्टÑवादीचे नेते गणेश नाईक यांनी हुसेन यांच्या पाठिंब्याच्या बदल्यात मीरा-भार्इंदर मतदारसंघ काँग्रेसला सोडत असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी हा मतदारसंघ राष्टÑवादीकडे होता. परंतु, गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी राष्टÑवादीचे घड्याळ काढत शिवसेनेचे बंधन हाती घेतले. त्यामुळे राष्टÑवादीची तशीही या भागातील ताकद कमी झाली आहे. शिवाय, काँग्रेसकडे येथे १२ नगरसेवकांचे संख्याबळ असून, तब्बल ७० हजारांच्या आसपास मतदार या पक्षाजवळ आहेत. त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी राष्टÑवादीने ही शक्कल लढवल्याचे बोलले जात आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ही रणनीती आखत असतानाच आगामी विधानसभा निवडणूकही आघाडी करूनच लढवण्याची तयारी काँग्रेस आणि राष्टÑवादीने केली आहे. त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे वळवण्यासाठी राष्टÑवादीकडून हालचाली होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादी स्वतंत्र लढले होते. त्यावेळी राष्टÑवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना २४ हजार ३२० मते मिळाली होती. काँग्रेसचे नारायण पवार यांना १५ हजार ८८३ मते मिळाली होती. परंतु, आता या दोघांनीही भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ही जागा आता कोण लढवणार, असा प्रश्न उभा ठाकला आहे. तत्पूर्वी २००९ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. त्यावेळी सुभाष कानडे यांना ३६ हजार २८८ मते मिळाली होती. परंतु, आता काँग्रेसची ताकद ठाण्यात कमी झाली असून राष्टÑवादीची ताकद बऱ्यापैकी असल्याने येत्या काळात ठाणे शहर विधानसभा क्षेत्रावर राष्टÑवादी दावा ठोकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. किंबहुना, मीरा-भार्इंदरच्या बदल्यात ठाणे असे समीकरणसुद्धा निश्चित झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.मुझफ्फर हुसेनांनी दिला घड्याळाला हातमीरा रोड - मोदी सरकारवर शेतकरी, महिला, तरुण, कामगार, व्यापारी आदी सर्वच घटक नाराज असून, या निवडणुकीत जनता आपला क्रोध व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी मीरा रोड येथे पत्रकार परिषदेत केली. मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडला असून, प्रचाराची धुरा काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यावर सोपवल्याचेही नाईक यांनी जाहीर केले.न केलेल्या कामांचा ढोल वाजवत मोदी सरकार स्टंटबाजी करत आहे. जनतेची फसवणूक करून संविधान आणि लोकशाहीच नेस्तनाबूत केली जात आहे. नोटाबंदीमुळे रोजगार-व्यापार बुडाल्याचेही नाईक म्हणाले. भार्इंदर रेल्वे टर्मिनस बनवणे, दहिसर-मीरा-भार्इंदर रस्ता आदी अनेक कामेच झाली नसल्याचा आरोप आनंद परांजपे यांनी केला.धर्म व जातीच्या नव्हे, तर गणेश नाईक, संजीव नाईक, मुझफ्फर हुसेन आदींनी केलेल्या कामांच्या बळावर मते मागणार असल्याचे आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यावेळी म्हणाले. शहरात टीडीआर, आरक्षण घोटाळा १० हजार कोटींचा असून हे घोटाळे लवकरच बाहेर काढू, असा इशारा आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, राष्ट्रवादीचे दिनकर तावडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthaneठाणे