शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाड अटकेच्या निषेधार्थ पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

By जितेंद्र कालेकर | Updated: November 11, 2022 17:22 IST

चित्रपटगृहतील प्रेक्षकाला मारहाण प्रकरणी ठाण्यात माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह ११ जणांना अटक, पोलीस बंदोबस्तात वाढ

ठाणे: विवीयाना मॉल मधील चित्रपट गृहतील एका प्रेक्षक दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह ११  वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. हरहर महादेव चित्रपटावरून मॉलमधील मारहाणप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही, तो मी गुन्हा कबूल करणार नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी ट्विट करून व्यक्त  केली आहे.

आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज दुपारी साधारण १ वाजता वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटले की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.

मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर पोलीस उपायुक्त विनय राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. दरम्यान, आव्हाड यांनीच ही माहिती ट्विट द्वारे दिल्यामुळे ठाणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्याला दुपारी ३ वाजल्यापासून  घेराव घालत आंदोलन केले. आव्हाड साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है, जितेंद्र आव्हाड अंगार है, बाकी सब भंगार है, सरकार डरती, पोलीस को आगे करती है, अशी जोरदार घोषणाबाजी करीत अटकेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड