शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नवघरची दफनभूमी शिवसेना, मनसेच्या विरोधानंतर स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 03:18 IST

महापालिका आयुक्तांनी नवघर दफनभूमी विकसित करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीविरोधात स्थानिकांच्या शनिवारी रात्री झालेल्या निषेध सभेत सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठवण्यात आली.

मीरा रोड - महापालिका आयुक्तांनी नवघर दफनभूमी विकसित करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीविरोधात स्थानिकांच्या शनिवारी रात्री झालेल्या निषेध सभेत सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठवण्यात आली. आयुक्तांनी दफनभूमीसाठी पर्यायी जागा शोधण्याचे आश्वासन दिल्यानंतर आ. प्रताप सरनाईक यांनी मोर्चा स्थगित करत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, सोमवारी मनसेनेही आयुक्तांची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला.सत्ताधारी भाजपाने महासभेत बहुमताने ठराव करून नवघर गावामागील जमीन दफनभूमीकरिता बोहरा, सुन्नी समाजांना देण्याचे ठराव केले होते. पण, स्थानिकांनी तसेच नगरसेवकांनी त्याला विरोध केला आहे. आयुक्त खतगावकर यांनी ग्रामस्थ व बोहरा समाजाची मंगळवारी बैठक बोलावली असल्याचे कळताच आ. सरनाईक यांनी आयुक्तांना पत्र देऊन सदर जागा कांदळवन, पाणथळ व सीआरझेड-१ ची असून स्थानिकांना मासेमारीसाठी दिली आहे. त्यामुळे पालिकेने केलेला कचऱ्याचा भराव काढून टाकण्याची मागणी केली. सत्ताधारी भाजपाकडून मतांसाठी नाहक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा खटाटोप असल्याचा आरोप करत सोमवारी शिवसेनेने सोमवारी पालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता.शनिवारी रात्री झालेल्या निषेध सभेत ग्रामस्थ, आ. सरनाईक, विरोधी पक्षनेते राजू भोईर, माजी उपनगराध्यक्ष अरु ण कदम, स्थानिक नगरसेवक प्रवीण पाटील, वंदना पाटील, संध्या पाटील, अनंत शिर्के आदी उपस्थित होते.सरनाईक म्हणाले की, नवघरच्या नागरिकांनी सेनेच्या नगरसेवकांना निवडून दिले म्हणून हेतुत: हा प्रकार केला जात आहे. पण, आयुक्त खतगावकर यांनी दफनभूमीसाठी वेगळी जागा शोधण्याचे निर्देश दिले असल्याने मोर्चा स्थगित करत आहे.कांदळवन लावा, मासेमारीसाठी जमीन द्यामनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सोमवारी महापालिका आयुक्त खतगावकर यांची भेट घेतली. यावेळी मनसे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे मनसैनिक व काही ग्रामस्थही उपस्थित होते.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दफनभूमी होणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांच्या भेटीनंतर घेतली असून पालिकेने नाहक भाजपाच्या दबावाखाली धार्मिक तेढ निर्माण करू नये, असा इशारा दिला. कचरा व मातीचा टाकलेला भराव काढून तेथे पुन्हा कांदळवन लावावे आणि मासेमारीकरिता जमीन स्थानिकांना द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरnewsबातम्या