शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सव : गोंडा आणि कच्छी वर्कला पसंती, घागºयापासून ज्वेलरीपर्यंत खरेदीचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 06:24 IST

नवरात्रोत्सवात तरुणींची पावले घेरदार घाग-यांच्या खरेदीसाठी वळतात. यंदा कच्छी आणि गोंडा वर्कच्या घाग-याची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. गोंडा वर्क केवळ घाग-यात नव्हे, तर नवरात्रीनिमित्त आलेल्या कॅपपासून ज्वेलरीपर्यंत सर्वत्र दिसून येत आहे.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : नवरात्रोत्सवात तरुणींची पावले घेरदार घाग-यांच्या खरेदीसाठी वळतात. यंदा कच्छी आणि गोंडा वर्कच्या घाग-याची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. गोंडा वर्क केवळ घाग-यात नव्हे, तर नवरात्रीनिमित्त आलेल्या कॅपपासून ज्वेलरीपर्यंत सर्वत्र दिसून येत आहे.नवरात्रोत्सवानिमित्त बाजार सजला आहे, तो आकर्षक घागºयांनी आणि त्यासोबत वापरल्या जाणा-या ज्वेलरींनी. दरवर्षी घागºयात नावीन्य शोधणा-या या तरुणींसाठी यंदा आकर्षक घागरे आले आहेत. गतवर्षी नेटच्या फॉर्ममध्ये असलेला आणि तीन लेअर्सचा ‘सनेडो घागरा विथ नेट’ आणि ‘कली घागरा’ तरुणाईचे आकर्षण ठरला होता. यंदा मात्र कच्छी वर्क आणि गोंडा वर्कचा घागरा आणि त्यासोबत वापरल्या जाणाºया ज्वेलरीने वेड लावले आहे. आबला वर्क, मोरकटचे घागरेही या गर्दीत दिसून येत आहेत. गोंडा पट्टीवर्क आणि हॅण्डवर्क असलेला दुपट्टा यंदा आकर्षित करत आहे. गडद रंगाचे हे मिक्स मॅचिंग दुपट्टे तरुणींच्या पसंतीस उतरले आहेत. घागºयाबरोबर हे दुपट्टे लक्ष वेधून घेत आहेत. घागºयात घेरदार घागरा आणि थ्री फोर्थ घागºयाला तरुण मुली जास्त पसंती देत आहेत. कमी वजनाच्या पण जास्त घेरवाल्या घागºयाच्या खरेदीकडे मुली वळत असल्याचे कल्पना गाला यांनी सांगितले. ३० ते ३२ कलीपासून अगदी ५२ कलींचा घागराही पाहायला मिळत आहे. स्पर्धेत सहभागी होणारे गरबाप्रेमी जास्तीतजास्त कलीच्या घागºयाकडे वळत आहेत. ज्यांना घागरा आवडत नाही, अशांसाठी हॅण्डवर्क केलेल्या पजामा कुर्तीदेखील आल्या आहेत. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट पजामा कुर्तींना जास्त पसंती आहे. या पेहरावाला वेगळा लूक देण्यासाठी कुर्तीसोबत जॅकेटची खरेदी केली जात आहे. घागरा आणि कुर्ती असाही पेहराव करण्याकडे मुली वळत आहेत. गेल्या वर्षी सिल्व्हर यंदा मात्र गोल्डन : गेल्या वर्षी गरब्याच्या कॉस्च्युममध्ये सिल्व्हर कलर अधिक दिसून येत होता. यंदा मात्र गोल्डन कलरचा प्रभाव दिसून येत आहे. प्रत्येक घागºयात गोल्डन कलर हा प्रामुख्याने पाहायला मिळत आहे.बकरा कॅप ठरणार आकर्षण : गरब्याच्या पोशाखात कॅपचीदेखील खरेदी केली जाते. यात साफा, पगडी कॅपबरोबर बकरा कॅप नव्याने दाखल झाली आहे. ‘बकरा कॅप’ने सर्वांनाच भुरळ घातली आहे. या कॅपचे दर कमी असल्याने मागणीत वाढ असल्याचे गाला यांनी सांगितले. या सर्व कॅपमध्येही कच्छी वर्क दिसून येत आहे.डेनिम जॅकेटला तरुणींची पसंतीगरब्याच्या पारंपरिक पेहरावाला हटके लूक देण्यासाठी जॅकेटची आवर्जून खरेदी केली जाते. वर्क केलेले कॉटनचे जॅकेट दरवर्षी बाजारात येतात. यंदा कच्छी वर्क केलेले डेनिम जॅकेट बाजारात आले आहे. हे जॅकेट महाविद्यालयीन तरुणी प्रामुख्याने खरेदी करत आहेत. तसेच, आबला वर्क, आरी वर्क असलेले जॅकेटही उपलब्ध आहेत.यंदा कच्छ आणि गोंडा वर्कने तरुणाईला भुरळ घातली आहे. त्यामुळे हे वर्क असलेले दागिने असो वा घागरे, याचीच जास्त खरेदी होत आहे. त्याचबरोबर भूजच्या दागिन्यांनाही पसंती आहे. - कल्पना गाला

टॅग्स :Navratriनवरात्री