शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य - न्या. अभय ओक

By सुरेश लोखंडे | Updated: August 22, 2022 15:06 IST

डोंबिवलीच्या खोणी येथील 'घरकुल' संस्थेमार्फत रविवारी पाणवठा' या संस्थेच्या परिवारातील २५ स्वयंसेवकांचा सत्कार न्या. ओक यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला.

- सुरेश लोखंडे

ठाणे : राज्य घटनेने नेमुन दिलेल्या संविधानात निसर्ग संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य दिले आहे. प्राणी क्षेत्रात काम करायला धैर्य लागते. त्यातही अपंग प्राण्यांसाठी काम करणे अधीक त्रासदायक आहे. त्यामुळे 'पाणवठा' या संस्थेचे कार्य खरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी कल्याण तालुक्यातील डोंबिवलीच्या खोणी येथील कार्यक्रमात काढले. यावेळी अनेक प्राण्यांबाबत याचिकांवर दिलेल्या निकालांचा उल्लेखही यावेळी केला.

डोंबिवलीच्या खोणी येथील 'घरकुल' संस्थेमार्फत रविवारी पाणवठा' या संस्थेच्या परिवारातील २५ स्वयंसेवकांचा सत्कार न्या. ओक यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी राज्य घटनेने नेमुन दिलेल्या संविधानात निसर्ग संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी 'पाणवठा' या मुक्या प्राण्यांची सेवा करणार्या संस्थेचे प्रा. गणराज जैन आणि डाॅ. अर्चना जैन यांच्यासह २५ स्वयंसेवकांचा गौरव करून त्यांना सौर कंदील, सन्मानचिन्ह दिले आणि पाणवठाचे कार्य खरच कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाला कल्याणच्या तहसिलदार सुषमा बांगर, स्पेशल मुलांच्या 'घरकुल' आश्रमच्या अमेय पालक संघटनेचे अविनाश बर्वे आदी उपस्थित होते.   बदलापूर आणि वांगणी दरम्यान चामकोली गावालगत  जैन यांचे मुक्या प्राण्यांसाठी पाणवठा संस्थेचा पाण्याचा आश्रम आहे. सध्या या आश्रमात ११० मोकाट,बेवारस प्राण्यांवर उपचार सुरू आहेत. अपंग प्राण्यांचा अनाथाश्रमात कायमस्वरुपी अपंग झालेल्या प्राण्यांचे संगोपन केले जाते. या अपंग प्राण्यांची माऊली डाॅ. अर्चना जैन व त्यांचे पती गणराज जैन या अनोख्या दांपत्याने पाणवठा या अंपग प्राण्यांच्या आश्रमाची स्थापना केली. हे दांपत्य गेली अनेक वर्षे प्राणी क्षेत्रात कार्यरत आहे. हजारो प्राण्यांना नवे सुखकर आयुष्य देण्यात त्यांना यश मिळाले आहे. 

आश्रमाची सर्वात अधोरेखीत करण्यासारखी बाब आहे स्वच्छता. शंभरहून अधीक अपंग, अंध प्राणी आजही आश्रमात दाखल आहेत. परंतु तरीही साधारणपणे प्राण्यांच्या शेल्टर्समधे जाणवणारा कोणताही वास येथे जाणवत नाही. पिल्लांचा निट-नेटका सांभाळ, स्वतःचे विज कनेक्शन नसुनही प्रत्येक पिजर्‍यात असलेली लाईट व्यवस्था, प्रत्येक पिल्लांचे बेड, एसटीएस म्युजीक थेरपी, प्राण्यांची मानसीक व शारीरीक दृष्ट्या घेतली जाणारी काळजी आदी या सर्व बाबी देखील पाणवठा आश्रमाचे वेगळेपण दर्शवते. हे दाम्पत्य गेली १७ वर्षे प्राणी क्षेत्रात कार्यरत असून पाणवठा हा भारतातील पहिला अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम त्यांनी स्थापन केला आहे.            गेली १० वर्षे सफर नावाचे जखमी प्राण्यांचे मोफत उपचार केंद्र चालवले आहे. आजपर्यंत ४५०० पेक्षा अधिक प्राण्यांवर या केंद्रात मोफत उपचार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या आश्रमात पोपट, माकड, खवले मांजर, निलगाय, सांबर, भेकर तसेच विविध पक्षी इत्यादींचा समावेश आहे. त्याचबरोबर 'सावली गोशाळा' या त्यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून १५० पेक्षा जास्त गाई त्यांनी गरजू शेतकर्‍यांना मोफत दिल्या आहेत.  

टॅग्स :thaneठाणे