शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग गुजरातला हलवल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवकांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन

By सुरेश लोखंडे | Updated: September 20, 2022 17:11 IST

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी जोरदार निदर्शने करून राज्य शासनाचा निषेध केला. 

ठाणे : तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचा आरोपासह राज्यातील भाजपा सरकारने राज्यातील वेदांत ग्रुपचा उद्योग गुजरातच्या घशात घातला आदी आरोप करीत जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी जोरदार निदर्शने करून राज्य शासनाचा निषेध केला. येथील शासकीय विश्रामगृहासमोर जिल्ह्यातील युवक सकाळी मोठ्यासंख्येने एकत्र येऊन या निदर्शनात सहभागी झाले. यावेळी महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बाप्पाचा, बंद करा गुजरातची गुलामी, गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी, गद्दारांना ५० खोक्के महाराष्ट्राला धोक आदी आशा घोषणांचे फलक घेऊन या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी करून रोजगार वाढीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले. यास अनुसरून या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्याचे नावे निवेदन दिले.राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय आंदोलनास अनुसरून जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येत या धरणे आंदोलनात सहभाग घेतला. या युवा कार्यकर्त्यांचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, ठाणे शहर अध्यक्ष विक्रम खामकर आदीनी केले. यावेळी जिल्हह्यातील राष्ट्रवादीचे युवक पदाधिका विधानसभा क्षेत्र अध्यक्ष, कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, आणि वॉर्ड अध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांसह युवका कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे