शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राष्ट्रवादीत पेटला अंतर्गत कलह; दहा नगरसेवकांनी घेतली पवारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 00:52 IST

२०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली असताना ठाण्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्टÑवादी काँग्रेसमध्ये जोरदार अंतर्गत कलह पेटला आहे.

ठाणे : २०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली असताना ठाण्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्टÑवादी काँग्रेसमध्ये जोरदार अंतर्गत कलह पेटला आहे. या पक्षाच्या ३५ पैकी १० नगरसेवकांनी एकजूट करून आ. जितेंद्र आव्हाड आणि पक्षाचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह महापालिकेतील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. आव्हाडांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या नेत्यानेच या गटाचे नेतृत्व करून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रारी केल्याने राष्ट्रवादीत खळबळ माजली आहे.ठाण्यात राष्टÑवादी काँग्रेसचे ३५ नगरसेवक आहेत. शिवसेनेनंतर दुसºया क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्टÑवादी काँग्रेसकडे बघितले जाते. आंदोलने आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून ठाण्यात पक्ष जिवंत ठेवण्याचे काम आजही सुरू आहे. अशा स्थितीत ३५ पैकी १० नगरसेवकांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानी गुरुवारी भेट घेतली. या भेटीमागचे कारण लोकांना दाखवण्यासाठी वेगळे असले, तरी प्रत्यक्षात या भेटीदरम्यान नगरसेवकांनी आव्हाड आणि परांजपे यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काळात निवडणुका असून पक्षाला सक्षम नेतृत्व नसल्याचा आरोप करून या गटाने आव्हाड आणि परांजपेंच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. पक्ष वाढण्यासाठी विशेष प्रयत्न होत नसल्याचा आरोप करून शहराध्यक्ष बदलण्यासह इतर मागण्यासुद्धा त्यांनी केल्या.आश्चर्य म्हणजे या १० नगरसेवकांचे नेतृत्व हे आव्हाडांच्या अगदी जवळचे, त्यांचे खंदे समर्थक नजीब मुल्ला यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि इतर नगरसेवकांचाही समावेश होता. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नजीब मुल्ला यांच्यासाठी आव्हाड यांनी परिश्रम घेतले होते, हे विशेष. आनंद परांजपे आणि मिलिंद पाटील यांच्यामुळे पक्षाची वाताहत झाली आहे. या दोघांनी पक्ष विकायला काढला असल्याचा स्पष्ट आरोपही यावेळी करण्यात आला. नजीब मुल्ला यांनी या वृत्ताचे खंडण केले आहे. मी शरद पवार यांना प्रत्येक आठवड्यात भेटतो. मी केवळ ठाण्याचा नव्हे तर राज्याचा नेता आहे. पवार यांच्या भेटीमध्ये ठाण्याच्या कोणत्याही नेत्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नव्हती, असा दावा मुल्ला यांनी केला.

१० नाराज नगरसेवकांना त्यांचे गा-हाणे लेखी स्वरूपात देण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे. विशेष म्हणजे, नगरसेवकांना त्यांचे म्हणणे गणेश नाईक यांच्याकडे देण्यास पवार यांनी सांगितले आहे.राष्ट्रवादी उवाच...आम्ही नेहमीप्रमाणे पवारसाहेबांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. कुणाला पक्षातून काढण्याच्या मागणीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी त्यांची भेट घेतली नव्हती.- हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवकया बैठकीचे मला निमंत्रण नव्हते. त्यामुळे तिथे काय झाले, याची मला कल्पना नाही. पक्षप्रमुखाच्या आदेशानुसार मी पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.- आनंद परांजपे, शहराध्यक्षप्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते. परंतु, ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा, याचा विचार ज्याचा त्यानेच करावा.- जितेंद्र आव्हाड, आमदारज्यांच्या कृत्यामुळे पक्षाची वाताहत झाली, त्यांनीच अशा प्रकारे इतरांवर आरोप करणे चुकीचे आहे. दुसºयाकडे बोट दाखवताना तीन बोटे आपल्याकडे असतात, हे त्यांनी विसरू नये.- मिलिंद पाटील,विरोधी पक्षनेते, ठामपा

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस