शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक विभागासह विविध प्रलंबित खटल्यांसाठी ठाणे, पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत

By सुरेश लोखंडे | Updated: December 4, 2023 16:20 IST

९ डिसेंबरला अनेक खटले निकाली निघण्याची शक्यता

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ठाणे आणि पालघर जिल्हयातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार, सहकार आदी न्यायालयांसह जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, शाळा न्यायाधीकरण, ऋण वसुली न्यायाधीकारण व इतर न्यायालयांमध्ये ९ डिसेंबररोजी "राष्ट्रीय लोकअदालत" चे आयोजन करण्यात आले आहे.

येथील प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे तथा प्रभारी अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे ए. एम. शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे अंतर्गत या राष्ट्रीय लाेक अदालतीचे आयाेजन करण्यात आले आहे. या लोकअदालतमध्ये ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्व मा.न्यायालयांमधील दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची प्रकरणे, वैवाहिक स्वरूपाची, चेक संबंधीची अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बैंक वसूली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगार विषयक बाय, भूसंपादन प्रकरणे, विज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूली प्रकरणे तसेच दावा दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत, याशिवाय थकित बिले, थकित कर्ज रक्कम प्रकरणांबाबत दावा दाखल पूर्व प्रकरणे नोंदवून त्यामध्ये लोकअदालत पॅनलच्या सहाय्याने तडजोड करण्याची व तडजोड अंतिम रक्कम भरण्याची सूवर्णसंधी दिली जाणार आहे.

वाहतूक नियमांचं उल्लंघनाची अनेक तडजोडपात्र प्रकरणे तडजोडीने निकाली काढली जाणार आहे. त्यासाठी माेठ्या संख्येने सहभागी हाेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे सचिव ईश्वर सूर्यवंशी आणि ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणे