शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

जीसीसी ठेक्याच्या विरोधात राष्टÑवादी जाणार न्यायलयात, तिकीट दरवाढ केवळ ठेकेदारासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 17:57 IST

ठाणे परिवहन सेवेमार्फत तिकीट दरवाढ करण्याचे प्रस्तावित केल्यानंतर परिवहन समितीने ती दरवाढ फेटाळली आहे. परंतु केवळ इलेक्शन फंड गोळा करण्यासाठी आणि ठेकेदाराची झोळी भरण्यासाठी ही दरवाढ करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

ठळक मुद्देउत्पन्नापेक्षा खर्च जास्तपरिवहनच्या बसेसपोटी १४ लाखांचे उत्पन्न

ठाणे - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे या जीसीसी ठेक्याच्या विरोधात आता उच्च न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.              ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, शहर अध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक नजीब मुल्ला, सुहास देसाई, मुकुंद केणी आदी उपस्थित होते. ठाणे परिवहनने सादर केलेला अर्थसंकल्प हा तुटीचा असून ठेकेदाराची तुट भरुन काढण्यासाठीच हा तिकीट दरवाढीचा फंडा पुढे आणण्यात आल्याचा आरोपही यावेळी आव्हाडांनी केला. ठेकेदाराची झोळी भरुन काढतांना केवळ इलेक्शन फंड गोळा करण्याची तयारी शिवसेनेने या माध्यमातून केली असल्याचेही त्यांनी सांगितले. नवी मुंबईतही याच पध्दतीने कंत्राट देण्यात आले आहे. परंतु ठाणे महापालिकेने ठेकेदाराला वाढीव दर दिले असून ते चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या विरोधात आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.          यापूर्वी नवीन बसेस जीसीसीवर देण्यात आल्या आहेत. आता पुन्हा परिवहनच्या ताफ्यातील बसेस दुरुस्त करुन त्या खाजगी ठेकेदाराला देण्याचा घाट घातला जात आहे. एकीकडे जीसीसीच्या १७५ बसेसच्या माध्यमातून परिवहनला १५ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. तर परिवहनच्या ताफ्यात असलेल्या १२० बसेसच्या माध्यमातून १४ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे परिवहनच्या बसेस दुरुस्त करुन त्या स्वत:च चालविल्या तरी परिवहनचा फायदा होणार असल्याचे मत यावेळी नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले. जीसीसीला देण्यासाठी परिवहनकडे पैसे आहेत, परंतु स्वत:च्या बसेस दुरुस्तीसाठी पैसे का नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यातही जीसीसीच्या माध्यमातून परिवहनला १५ लाखांचे उत्पन्न मिळत असले तरी दुरुस्तीचा खर्च २३ लाख आहे, त्यामुळे दिवसाला परिवहनचे ८ लाखांचे नुकसान होत असतांनाही केवळ गोल्डन ठेकेदार आणि प्रशासनामध्ये असलेल्या लागेबांधेमुळेच हा प्रकार घडत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे तिकीट दरवाढ रद्द करावी, आणि जीसीसीच्या प्रस्तावाचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड