शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रा.स्व.संघाचे संचालन-उत्सव संपन्न, दस-यालाही बाजार गडगडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 20:47 IST

दस-यानिमित्त डोंबिवलीतील बाजारपेठेमध्ये शनिवारी सकाळच्या वेळेत व्यावसायिकांमध्ये उत्साह असला तरीही ग्राहकांनी मात्र बाजाराकडे पाठ फिरवली.

डोंबिवली: दस-यानिमित्त डोंबिवलीतील बाजारपेठेमध्ये शनिवारी सकाळच्या वेळेत व्यावसायिकांमध्ये उत्साह असला तरीही ग्राहकांनी मात्र बाजाराकडे पाठ फिरवली. आठवडाभरापासून सुरु असलेल्या नवरात्रौत्सवामुळे फुल बाजारात तेजी होती. बाजीप्रभु चौकातील छोट्या व्यावसायिकांमध्ये दस-यानिमित्त तर भाजीबाजारात गर्दी झाल्याने त्या विक्रेत्यांमध्ये समाधान होते. पण मोठ्या व्यावसायिकांमध्ये मात्र नाराजी होती.

भाज्यांचे भाव कडाडलेले असतांनाही नऊ दिवसांचे उपास सुटणार असल्याने फळभाज्यांना जास्त मागणी होती. सकाळी ११ पर्यंत बाजारात गर्दी दिसून आली, पण संध्याकाळी फारशी गर्दी नव्हती. बाजारपेठेतील प्रमुख सराफांकडे चौकशी करणारा ग्राहक वर्गाची गर्दी होती, पण नोटबंदी आणि महागाईमुळे खरेदीकरण्याकडे ग्राहकांचा कल नसल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. महिन्याचा अखेरचा दिवस असून तीन दिवसांच्या सलग सुटीमुळे अपेक्षित उलाढाल झाली नसल्याचे सांगण्यात आले. पारंपारिक पद्धतीने झेंडुचे तोरण आणि फुलांना मागणी होती, पण दुपारनंतर झेंडुचा भाव गडगडला. सकाळी ३० रुपये पावकिलो असणारा झेंडु संध्याकाळी २० रुपयांवर विकला गेला.

* देवींचे विसर्जन : दस-यानिमित्त पश्चिमेकडील रेती भवन परिसरातील देवीचे पारंपारिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. त्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. पूर्वेलाही गांधीनगर, मानपाडा रोड, गोग्रासवाडी, एमआयडीसी परिसरातील देवीचे मिरवणुक काढुन ठिकठिकाण विसर्जन करण्यात आले. एल्फीस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेमुळे कुठेही फारसा गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने मिरवणुका काढल्या गेल्याचे पोलीसांनी सांगितले.

* रा.स्व.संघाच्या वतीने बाजीप्रभू नगर, लोकमान्य नगर, समर्थ नगर, एकलव्य नगर, दीनदयाळ नगर, नेताजी सुभाष नगर आदी ठिकाणी डोंबिवलीत विजयादशमीनिमित्त पथसंचालन करण्यात आले. कोकण प्रांताचे प्रचारप्रमुख प्रमोद बापट यांनी केलेल्या आवाहनानूसार अत्यंत साधेपणाने संचालन काढण्यात आले होते. काही ठिकाणी रविवारी उत्सव-बौद्धिक संपन्न झाले तर काही नगरांमध्ये रविवारी उत्सव करण्यात येणार आहेत. शनिवारी समर्थ नगराचे शास्त्री हॉल येथे उत्सव झाला. दीनदयाळ नगराचा स्वामी विवेकानंद शाळेच्या राणाप्रताप भवन येथिल शाळेत, आणि भागशाळा मैदानात, लोकमान्य नगरचा अयोध्या नगरी मैदानानजीक शांतीनगर शाळेत उत्सव घेण्यात आला.* रविवारी होणा-या संघाच्या उत्सवांमध्ये बाजीप्रभू नगरचा उत्सव जोशी हायस्कूल मैदानात संध्याकाळी ६ वाजता, मानपाडेश्वरचा सर्वोदय स्कूल निळजे, आणि हनुमान नगरमधील एकता मित्र मंडळ, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ५.३० वाजता होणार आहे.