शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बाळ विक्रीचे नाशिक, कर्नाटक कनेक्शन; नोंदणी रद्द होऊनही उल्हासनगरमध्ये सुरू होते नर्सिंग होम 

By सदानंद नाईक | Updated: May 20, 2023 12:46 IST

बाळाची विक्री केल्याबद्दल पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. चैनानी, त्यांच्या सहकारी प्रतिभा, नाशिकच्या संगीता वाघ, बेळगाव कर्नाटकचा देवाण्णा कमरेकर व बाळाची आई गंगादेवी योगी यांना न्यायालयाने २२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

उल्हासनगर : जेमतेम २२ दिवसांच्या बाळाची विक्री करणाऱ्या डॉ. चित्रा चैनानी यांच्या महालक्ष्मी नर्सिंग होमची नोंदणी रद्द झाली असतानाही हे नर्सिंग होम सुरू होते, अशी धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे. डॉ. चैनानी हिच्यावर बाळ विक्रीचा यापूर्वीही गुन्हा दाखल आहे. बाळ विक्रीचे हे रॅकेट उल्हासनगर, नाशिक ते कर्नाटकातील बेळगावपर्यंत आहे.बाळाची विक्री केल्याबद्दल पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. चैनानी, त्यांच्या सहकारी प्रतिभा, नाशिकच्या संगीता वाघ, बेळगाव कर्नाटकचा देवाण्णा कमरेकर व बाळाची आई गंगादेवी योगी यांना न्यायालयाने २२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. उल्हासनगर कॅम्प नं. ३ येथील महालक्ष्मी नर्सिंग होममध्ये मुलाची विक्री होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ठाणे क्राइम ब्रँचला दिली होती. त्यानंतर बनावट ग्राहक पाठवून बाळ विक्रीचा पर्दाफाश झाला. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता सपकाळे यांनी सांगितले की, महालक्ष्मी नर्सिंग होमचे रजिस्ट्रेशन अनेक वर्षांपूर्वी रद्द केल्याची नोंद महापालिका आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे. 

‘लोकमत’ने उपस्थित केलेले प्रश्न- डॉ. सपकाळे यांच्या दाव्यानुसार नर्सिंग होमचे रजिस्ट्रेशन रद्द असताना नर्सिंग होम कसे सुरू होते?- महापालिका आरोग्य विभाग शहरातील क्लिनिकला भेटी देऊन तपासणी करीत नाही का?- आरोग्य विभागाच्या संगनमताने हे क्लिनिक सुरू होते का?- महालक्ष्मी नर्सिंग होमवर आरोग्य विभागाने कारवाई का केली नाही?

दोषींवर कारवाईची मागणीसंबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यापूर्वीही डॉ. चैनानी हिच्यावर बाळ विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे बोलले जात आहे. डॉ. चैनानी हिच्या पदवीची चौकशी पोलिस करीत असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी मधुकर कड यांनी दिली. 

असा आहे घटनाक्रम नर्सिंग होमच्या डॉ. चित्रा चैनानी यांची नाशिकमधील दलाल संगीता वाघ हिने बाळाची आई गंगादेवी योगी हिची ओळख करून दिली. बेळगाव येथील दलाल देवाण्णा याचाही बाळ विक्रीच्या रॅकेटमध्ये सहभाग आहे. राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमधील गोरगरीब, गरोदर महिलांना हेरून त्यांना त्यांची मुले विकण्याकरिता मोठ्या रकमेचे आमिष दाखवले जाते. न्यायालयाने आरोपींना २३ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी