शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नरेश म्हस्केंनी सुर्यावर थुंकू नये, आनंद परांजपे यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 21:50 IST

शुक्रवारी नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा परांजपे यांनी समाचार घेतला.

ठाणे: महाराष्ट्र सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने काय टीप्पणी केली आहे, यावर आधी नरेश म्हस्के यांनी बोलावे; त्यानंतरच आमच्या नेत्यांवर टीका करावी. सध्या त्यांची प्रतिमा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना "शाखा ताब्यात घेणारे नेते" अशीच झालेली आहे. त्यामुळे या शाखाचोराने जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर स्पष्टीकरण द्यावे. उगाच सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करु नये, असा प्रतिहल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचेठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी चढविला.  

शुक्रवारी नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा परांजपे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, सध्या म्हस्के यांची ख्याती जबरदस्तीने, पोलिसांच्या मदतीने शिवसेना शाखा ताब्यात घेणारा ‘प्रवक्ता’ अशीच झालेली आहे. शाखा ताब्यात घेण्यापासून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे असो, या कामात सध्या ते आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुरुवातीला मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या मंत्रिमंडळात सहभागी झालात. नगरविकास, एमएसआरडीसीसारखी महत्वाची खाती तुमच्याकडे असताना पहिल्या दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खुर्ची कशी खेचता येईल, याचे प्रयत्न तुम्ही सुरु केले होते. याला बंड म्हणायचे की गद्दारी? हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलेच कळतेय. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल आहे. सर्वोच्च न्यायालयाचीही अत्यंत घाणेरडी टिप्पणी महाराष्ट्र सरकारबद्दल आलेली आहे. त्याके लक्ष द्यायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. सर्वच आघाड्यांवर हे सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे अशा निरर्थक टीका करुन जनतेचे लक्ष मूळ मुद्यांवरुन हटविण्याचा प्रयत्न म्हस्के हे करीत आहेत. ठाण्याचा विचार करता, आधी त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर बोलावे, गद्दारीचा कट कधी रचला; सर्वोच्च न्यायालयाने काय टीप्पणी केली, उच्च न्यायालयाने काय आदेश दिलाय, याचे स्पष्टीकरण द्यावे; त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार, आव्हाड यांच्यावर आरोप करावेत. ठाण्याच्या बाहेर विश्व नसलेल्या नरेश म्हस्के यांची आता-आता महाराष्ट्राच्या प्रवक्तेपदी गेले आहेत.  त्यांनी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करु नये. ही थुंकी आपल्याच तोंडावर पडते, याची जाणीवही म्हस्के यांना नाही, असा टोलाही परांजपे यांनी लगावला. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण