शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

 केडीएमसी क्षेत्रातील कोविड रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेतून विनामूल्य उपचार द्यावेत, नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 12:59 IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक परिपत्रक काढून कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित आपण लक्ष घालून कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी.

डोंबिवली - महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसाठी मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय १ मे महाराष्ट्र दिनी राज्याचे आरोग्यमंत्रीराजेशजी टोपे यांनी जाहिर केला आहे. असे असतांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक परिपत्रक काढून कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित आपण लक्ष घालून कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी. राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्णांवर मोफत उपचार करावेत अशी मागणी करणारे पत्र भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बुधवारी दिले आहे.केडीएमसी आयुक्तांच्या या निर्णयामुळे सर्व सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना आता बिल का आकारले जात आहे? राज्य शासनाने राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत उपचार देण्याचे जाहीर केलेले असतांना महानगरपालिकेमार्फत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणे हे अयोग्य असून  लॉकडाऊन काळात अनेकांवर आर्थिक संकट कोसळले असुन अश्या काळात नागरिकांत संभ्रम आणि नाराजी आहे.केंद्र व राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कोरोना योद्धे पुढे येऊन अत्यावश्यक सेवेत सहाभागी झाले आहेत, दुर्दैवाने त्यातील काहींना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांनाही उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे, याशिवाय अनेक पोलीस व इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींनाही हा निर्णय जाचक ठरत आहे. त्या निर्णयावर तातडीने कार्यवाही करीन महानगरपालिका प्रशासनास आदेश द्यावे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका