शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजवण्यासाठी देणार ५० लाख- नरेंद्र पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 03:27 IST

वाहतूककोंडी फोडण्यावर भर देण्याच्या सूचना

डोंबिवली : खड्डे भरण्यास निधी कमी पडत असेल, तर आमदार निधीतून ५० लाखांचा निधी देण्याची तयारी असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. खड्डे भरण्यासाठी पीआयसीसी या नव्या आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.कल्याणमधील रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूककोंडीची समस्या, याबाबत नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा, यासाठी पवार यांनी एक बैठक गुरुवारी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बोलावली होती. त्यावेळी केडीएमसी, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, वाहतूक पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.यंदाही पावसाळ्यात कल्याणमधील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. त्यातच मुंब्रा बायपासच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांची वाहतूकही कल्याणमार्गे वळवण्यात आली आहे. परिणामी, कल्याण शहरावर वाहतुकीचा प्रचंड ताण आला आहे. तासन्तास वाहनांचा खोळंबा होत आहे. पवार यांनी वारंवार याबाबत विचारणा केली असता सर्वच यंत्रणांनी एकमेकांकडे बोटे दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्व यंत्रणा समोरासमोर आणून तत्काळ तोडगा निघावा, या उद्देशाने बैठक घेतल्याचे ते म्हणाले.नागरिकांच्या सहनशीलतेचा यंत्रणांनी अंत पाहू नये, असे आवाहन करत तातडीने खड्डे बुजवावेत, वाहतुकीची समस्या सोडवावी, असे आवाहन पवार यांनी केले. त्यावर, कल्याण शहरात पत्रीपूल, दुर्गाडी पूल, वालधुनी आणि शहाड येथील उड्डाणपूल या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. पुलांवरील खड्डे त्याला कारणीभूत आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर पवार यांनी लवकरात लवकर पूल आणि मुख्य मार्गांवरील खड्डे भरण्याचे निर्देश दिले. वाहतुकीच्या नियोजनासाठी आणखी वॉर्डनची गरज असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. त्यावर पवार यांनी १० वॉर्डनचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवून त्यांची नियुक्ती तत्काळ करण्याचे आदेश दिले.‘ते’ गतिरोधक काढागोविंदवाडी बायपासवर पार्किंग, अतिरिक्त गतिरोधक, यामुळे अवजड वाहने तेथून वळवण्यात अडचण होते, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. त्यावर स्थानिक रहिवाशांच्या दबावामुळे हे गतिरोधक टाकल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकांºयानी दिली. नियमानुसारच गतिरोधक असावेत. अतिरिक्त गतिरोधक हटवावेत, असे पवार म्हणाले.

टॅग्स :Potholeखड्डेthaneठाणे